AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL, 3rd ODI : श्रीलंका दौऱ्यातील शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज, संघात ‘हे’ पाच बदल?

पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी तयार झाला आहे. मालिकेत विजयी आघाडी घेतल्यामुळे या सामन्यात भारत संघात नक्कीच बदल करुन युवा नवख्या खेळाडूंना संधी देईल.

IND vs SL, 3rd ODI : श्रीलंका दौऱ्यातील शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज, संघात 'हे' पाच बदल?
भारतीय संघ
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 11:22 AM
Share

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना कोलंबोच्या (Colombo) के प्रेमदासा मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होणार आहे. पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात उतरताना संघ नवे बदल करुन नवख्या खेळाडूंना संधी देण्याची शक्यता अधिक आहे.

ज्या खेळाडूंना पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली नाही त्यांना आज संधी मिळू शकते. यामुळे संघाला दोन फायदे होऊ शकतात. एकतर पहिले दोन सामने तंबूत बसलेल्या खेळाडूंचा सराव होईल आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अंतिम 11 निवडताना संघ व्यवस्थापनालाही फायदा होईल. भारताने मालिका आधीच जिंकली असल्याने अशाप्रकारचे प्रयोग भारतीय संघ करु शकतो.

टीम इंडियामध्ये हे 5 बदल शक्य

भारतीय संघ सर्वात पहिला बदल कर्णधार शिखर धवनला विश्रांती देऊन आणि त्याच्याजागी दुसरा सलामीवीर संघात सामिल करुन करु शकतो. शिखर धवनच्या जागी उपकर्णधार भुवनेश्वर कुमारला कर्णधार पद दिले जाऊ शकते. तसेच शिखर सोबत सलामीवीर पृथ्वी शॉलाही आराम देऊन देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड या नवख्या जोडीला सलामीला पाठवू शकतात. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आता दुखापतीतून सावरला असल्याने इशान किशनच्या जागी त्याला संधी मिळू शकते. तर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या वरिष्ठांना विश्रांती देऊन वरूण चक्रवर्ती आणि राहुल चहरला संघात स्थान दिले जाऊ शकते.

तिसऱ्या वनडेसाठी संभाव्य भारतीय संघ

भुवनेश्वर कुमार (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, संजू सॅमसन, दीपक चहर, राहुल चहर, वरूण चक्रवर्ती

हे ही वाचा :

India vs Sri Lanka, 3rd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

IND vs SL : ‘या’ कारणामुळे राहुल द्रविडने दीपकला लवकर फलंदाजीसाठी पाठवलं, भुवनेश्वरने केला खुलासा

(India vs Sri lanka 3rd ODI team India will come on field with 5 changes in playing xi)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.