AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 2nd T20: गोलंदाजांच्या मोठ्या चुकांवर हेड कोच Rahul Dravid यांची पहिली प्रतिक्रिया

IND vs SL 2nd T20: शांत-संयमी स्वभाव राहुल द्रविड यांची ओळख आहे. गोलंदाजांच्या या कामगिरीवर, ते म्हणाले की....

IND vs SL 2nd T20: गोलंदाजांच्या मोठ्या चुकांवर हेड कोच Rahul Dravid यांची पहिली प्रतिक्रिया
Rahul Dravid-Hardik pandyaImage Credit source: Getty
| Updated on: Jan 06, 2023 | 11:10 AM
Share

पुणे: भारतीय गोलंदाजांनी केलेल्या चुकांवरुन सध्या गदारोळ सुरु आहे. याच चुकांची चर्चा सुरु आहे. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाच्या बॉलर्सनी एक-दोन नव्हे, तर तब्बल 7 नो बॉल टाकले. एकच चूक वारंवार केली. बॉलर्सच्या या चुकांवर आता हेड कोच राहुल द्रविड यांनी वक्तव्य केलय. पुण्यात भारत-श्रीलंकेमध्ये दुसरी टी 20 सामना झाला. या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी 7 नोबॉल टाकले. यात 5 नो बॉल एकट्या अर्शदीप सिंहने टाकले. त्यावरुन गदारोळ सुरु आहे.

हा, तर क्राइम

हार्दिक पंड्याने इतके नो बॉल टाकणं हा क्राइम असल्याचं म्हटलय. सुनील गावस्कर यांनी सुद्धा टीमवर टीका केलीय. नो बॉलवरुन सुरु असलेल्या या गदारोळात हेड कोच राहुल द्रविड यांनी गोलंदाजांच समर्थन केलय. कुठल्याही गोलंदाजाला अतिरिक्त चेंडू टाकायचा नसतो, असं द्रविड म्हणाले.

राहुल द्रविड काय म्हणाले?

“कुठल्याही गोलंदाजाला वाइड किंवा नो बॉल टाकायचा नसतो. खासकरुन टी 20 क्रिकेटमध्ये अतिरिक्त चेंडूमुळे तुमचं जास्त नुकसान होऊ शकतं. युवा खेळाडूंबद्दल आपल्याला थोडा संयम बाळगावा लागेल. टीममध्ये अनेक युवा खेळाडू आहेत. खासकरुन आपल्याकडे युवा वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्याकडून वाइड किंवा नो बॉल सारखी चूक होऊ शकते” असं राहुल द्रविड म्हणाले.

दोघांचा फ्लॉप शो

“युवा खेळाडू सुधारणेसाठी खेळाडू कठोर मेहनत घेत आहेत. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करतोय” असं राहुल द्रविड म्हणाले. दुसऱ्या टी 20 सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज दोघेही चालले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी भरपूर धावा लुटवल्या. टीम इंडियाची टॉप ऑर्डरही या मॅचमध्ये फ्लॉप ठरली. भारतासाठी सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेलने सर्वाधिक धावा केल्या. दोघांनी अर्धशतकं झळकावली. मात्र, तरीही टीम इंडियाचा 16 धावांनी पराभव झाला.

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.