IND vs SL: भारत-श्रीलंका मालिकेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर, विराट कोहली मोहालीत खेळणार 100वी कसोटी

श्रीलंकेचा संघ सुमारे 3 आठवड्यांच्या भारत दौऱ्यावर येत आहे, ज्यामध्ये 3 टी-20 सामने आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. भारताचा दिग्गज खेळाडू विरोट कोहली त्याच्या कारकिर्दीतला शंभरावा कसोटी सामना मोहालीत खेळणार आहे.

IND vs SL: भारत-श्रीलंका मालिकेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर, विराट कोहली मोहालीत खेळणार 100वी कसोटी
Team India चे सुधारीत वेळापत्रक जाहीर
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 9:08 PM

मुंबई : बीसीसीआयने टीम इंडिया (Team India) आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात (IND vs SL Time Table) बदल जाहीर केले आहेत. श्रीलंकन ​​संघाच्या भारत दौऱ्याची सुरुवात 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेने होईल, तर 4 मार्चपासून मोहालीमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली मोहालीत 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार दोन्ही संघांमधील मालिका आधी 26 फेब्रुवारीपासून कसोटी सामन्यांनी सुरू होणार होती, परंतु आता वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या दौऱ्याची सुरुवात टी-२० सामन्यांनी होत आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, श्रीलंका क्रिकेटच्या विनंतीवरून टी-20 मालिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण श्रीलंका टी-20 संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे त्यामुळे संघाला एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये जावे लागणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिकाही खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघालाही एक बायो बबल पार करावे लागणार आहे.

कोहली होम ग्राऊंडला मुकणार

बीसीसीआयने मंगळवार श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. याअंतर्गत 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये तर पुढचे दोन सामने धर्मशाळा येथे होणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होतील, जिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल, तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आता मोहालीत 100 वा कसोटी खेळणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार, त्याची 100 वी कसोटी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होती, कारण या मालिकेची सुरुवात 26 फेब्रुवारीपासून बेंगळुरू येथे होणार्‍या कसोटीने होणार होती, परंतु वेळापत्रक बदलल्यामुळे यातही बदल झाला आहे. गेल्या 14 वर्षांपासून आयपीएलमध्ये बेंगळुरू हे त्याचे होम ग्राउंड (RCB) आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने प्रवास कमी करण्यासाठी मोहालीमध्ये पहिली कसोटी ठेवली आहे, जिथे संघ जवळच्या धर्मशाळा शहरातून पोहोचेल.

या मालिकेत भारत आणि श्रीलंकेचे संघ डे-नाईट कसोटीही खेळणार आहेत. ही कसोटी 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. अहमदाबादमध्ये ही कसोटी खेळली गेली आणि दोन दिवसांत सामना संपला. टीम इंडियाने पहिल्यांदा बांगलादेशविरुद्ध डे-नाईट टेस्ट खेळली आणि जिंकली, तर ऑस्ट्रेलियात पराभव झाला.

IND Vs SL मालिकेचे वेळापत्रक

24 फेब्रुवारी – पहिला T20 सामना, लखनौ 26 फेब्रुवारी – दुसरा T20 सामना, धर्मशाळा 27 फेब्रुवारी – तिसरा T20 सामना, धर्मशाळा 4-8 मार्च – पहिली कसोटी, मोहाली मार्च 12-16 – दुसरी कसोटी, बेंगळुरू (डे-नाईट)

IPL मध्ये ऑस्ट्रेलियाची गरज संपली का? हे आकडेच सर्वकाही सांगतील

हार्दिक पंड्याबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, कर्णधाराने सांगितलं T20 वर्ल्डकप टीममध्ये निवड कशी होणार?

Ramesh Kumar IPL 2022 Auction: टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10 चेंडूत अर्थशतक, धडाकेबाज फलंदाज KKR च्या ताफ्यात

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.