IND vs WI: भारताने 1000 वा वनडे सामना जिंकला, चहल-वॉशिंग्टन भारताच्या ‘सुंदर’ विजयाचे ‘हिरो’

कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit sharma) विजयी सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर (India vs west indies) सहा गडी राखून विजय मिळवला.

IND vs WI: भारताने 1000 वा वनडे सामना जिंकला, चहल-वॉशिंग्टन भारताच्या 'सुंदर' विजयाचे 'हिरो'
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 9:51 PM

अहमदाबाद: कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit sharma) विजयी सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर (India vs west indies) सहा गडी राखून विजय मिळवला. सूर्यकुमार यादव (34) आणि दीपक हुड्डा (26) या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताने सहज विजय मिळवला असं दिसतं असलं तरी, मध्ये गडबड झाली होती. रोहित शर्मा बाद (60) झाल्यानंतर विराट, (8) इशान किशन (Ishan kishan) (28) आणि ऋषभ पंत (11) ठराविक धावांच्या अंतराने बाद झाले. बिनबाद 84 अशा स्थितीमध्ये असलेल्या भारताची चार बाद 116 अशी स्थिती झाली होती. पण त्यावेळी सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डाने डाव सावरला व भारताला विजय लक्ष्यापर्यंत पोहोचवले. पहिलाच सामना खेळणाऱ्या दीपक हुड्डाने चांगली फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि इशान किशनने भारताला चांगली सुरुवात करुन दिली.

रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवला. त्याने 51 चेंडूत 60 धावांची खेळी करताना दहा चौकार आणि एक षटकार लगावला. दक्षिण आफ्रिकेतील वनडे सीरीजप्रमाणे येथेही चांगल्या भागादारीनंतर एक विकेट गेल्यानंतर पुन्हा डाव गडगडल्याच दिसून आले. यावेळी लक्ष्य छोटं असल्यामुळे अडचण आली नाही.

गोलंदाजांनी रचला विजयाचा पाया दरम्यान गोलंदाजांनी भारताच्या विजयाचा पाया रचला. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची फिरकी गोलंदाजी खेळणं वेस्ट इंडिजला झेपलचं नाही. आधी मोहम्मद सिराजने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. सलग दोन चौकार लगावल्यानंतर शाई होपला सिराजने बोल्ड केलं. चेंडू बॅटला लागून स्टंम्पवर आदळला. होप व्यक्तीगत आठ धावांवर आऊट झाला. ब्रँडन किंग-डॅरेन ब्राव्होची जोडी जमणार असं वाटत असतानाच भारताचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने वेस्ट इंडिजला एकाच षटकात दोन धक्के दिले. त्याने सलामीवर ब्रँडन किंगला 13 धावांवर सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. त्याच षटकात ब्राव्होला 18 धावांवर पायचीत पकडलं. यासाठी डीआरएस सिस्टिमचा आधार घेतला.

शामार्त ब्रूक्स आणि निकोलस पूरन यांची जोडी जमणार असं वाटत असतानाच युजवेंद्र चहलने ही जोडी फोडली. चहलने 18 धावांवर खेळणाऱ्या पूरनला पायचीत पकडलं.निकोलस पूरन पाठोपाठ वेस्ट इंडिजचा धोकादायक फलंदाज कॅप्टन कायरन पोलार्डला युजवेंद्र चहलने तंबूचा रस्ता दाखवला आहे. चहलने पोलार्डला भोपळाही फोडू न देताना क्लीन बोल्ड केलं. चहलने चार तर सुंदरने तीन विकेट घेतल्या. दोघांनी मिळून वेस्ट इंडिजच्या सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तिथेच वेस्ट इंडिजचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला होता.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.