AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका भारताने जिंकली, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिला विजय

भारताने दुसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताने 219 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. यासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने पहिली टी20 मालिका जिंकली आहे.

झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका भारताने जिंकली, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिला विजय
झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका भारताने जिंकली, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिला विजयImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 25, 2026 | 7:57 PM
Share

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवला. यासह तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असणार आहे. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण हा निर्णय भारतीय संघाच्या पथ्यावर पडला. भारतीय संघाने 20 षटकात 5 गडी गमवून 219 धावा केल्या आणि विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. झिम्बाब्वेचा संघ 17.5 षटकात 129 धावा करू शकला आणि भारताने हा सामना 91 धावांनी जिंकला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा हा पहिला टी20 मालिका विजय आहे. यापूर्वी त्याच्या नेतृत्वात भारताने आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धची टी20 मालिका गमावली होती.

भारताचा डाव

भारताची या सामन्यात सुरूवात काही चांगली झाली नाही. सलामीला आलेला अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाला. त्याचा डाव अवघ्या 8 धावांवर आटोपला. वैभव सूर्यवंशीने आक्रमक फटकेबाजी केली पण त्याला फक्त 20 धावा करता आल्या. त्यानंतर इशान किशनने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिसर्‍या विकेटसाठी या दोघांनी 42 चेंडूत 66 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरचा डाव 25 धावांवर बाद झाला. तिलक वर्मा मैदानात उतरला आणि त्याने इशानला साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली. त्यानंतर इशान किशन 81 धावांवर असताना तंबूत परतला. रिंकु सिंहचा डाव 12 धावांवर आटोपला. पण तिलकने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. त्याने 29 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. तर शिवम दुबेला तीन चेंडू खेळायला मिळाले आणि नाबाद 6 धावांवर राहिला.

भारताकडून विजयी धावा रोखण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने सात गोलंदाज मैदानात उतरवले. विशेष म्हणजे अभिषेक शर्माला देखील षटक दिलं. फलंदाजीत अपयशी ठरलेला अभिषेक शर्मा गोलंदाजीत मात्र यशस्वी ठरला. अभिषेक शर्माने 3 षटकात 17 धावा देऊन 3 विकेट काढले. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये ठेवण्याचं कारण मिळालं आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी