भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला तरीही कर्णधार सूर्यकुमार यादव नाराज, स्पष्ट सांगितलं की…
सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना सहज जिंकला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 172 धावा दिल्या होत्या. पण भारताने पॉवर प्लेमध्ये अर्धा खेळ खल्लास केला होता. या विजयानंतरही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाराजी व्यक्त केला.

भारत पाकिस्तान सामना म्हंटलं तर मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंनाही टेन्शन असतं. हायव्होल्टेज सामन्यात एखादी चूक घडली तर त्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागतो. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यात खेळाडू डोळ्यात तेल घालून असतात. पण कधी कधी चुका होतात. त्या चुका पराभवासाठी कारणीभूत ठरतात. सुपर 4 फेरीतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात असंच घडलं. भारतीय खेळाडूंकडून चुका झाल्या आणि पाकिस्तानने 171 धावांचा डोंगर रचला. खरं तर या धावा त्या खेळपट्टीवर करणं कठीण आहे. संथ गतीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पहिल्याच षटकात अभिषेक शर्माने झेल सोडला. त्यानंतर कुलदीप यादवने झेल सोडला. या दोन्ही खेळाडूंनी सोडलेल्या झेलमुळे भारताला 75 धावांचा फटका बसला. कारण झेल सोडलेल्या दोन्ही खेळाडूंच्या धावांची बेरीज केली तर तितकी येते. पण अभिषेक शर्माने फलंदाजीत या धावांची भरपाई केली. तसेच भारताच्या विजयात मोलाचा हात दिला. असं असूनही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव नाराज आहे. त्याने सामन्यानंतर खंत बोलून दाखवली.
सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर सुरुवातीला भारत गोलंदाज करताना काय झालं ते सांगितलं. सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘पहिल्या 10 षटकांनंतर खेळाडू शांत होते. ड्रिंक्स घेतल्यानंतर, मी त्यांना सांगितले की आता खेळ सुरू होतो.’ दुबेने आम्हाला परिस्थितीतून बाहेर काढले, असंही सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला. शेवटी त्याने आपली नाराजी बोलून दाखवली. तसेच झेल सोडणाऱ्या फलंदाजांना शेलक्या शब्दात सुनावलं. ‘पहिल्या डावानंतर, आमचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी आज ज्या खेळाडूंना बटर फिंगर्स होते त्यांना ईमेल केले आहे.’, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या दहा टी20 सामन्यांमध्ये नवव्यांदा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. आता भारताचा पुढचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर अंतिम फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. भारताचा शेवटचा सुपर 4 मधील सामना 26 सप्टेंबरला होणार आहे. तर पाकिस्तानसाठी आता करो या मरोची लढाई आहे. पाकिस्तानला बांग्लादेश आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. अन्यथा स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. जर पाकिस्तानने उर्वरित दोन्ही सामने जिंकले. तर भारत आणि पाकिस्तान संघ 28 सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने येतील.
