AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021 मध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजीपेक्षाही ‘ही’ गोष्ट अधिक महत्त्वाची, अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं मत

भारतीय संघाने दोन्ही सराव सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. पण सराव सामन्यांच्या तुलनेत मुख्य सामन्यात तेही पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्यासमोर खेळणं काहीसं अवघड ठरु शकतं.

T20 World Cup 2021 मध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजीपेक्षाही 'ही' गोष्ट अधिक महत्त्वाची, अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं मत
अजिंक्य रहाणे
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 11:22 PM
Share

T20 World Cup 2021 : यंदाच्या टी20 विश्वचषकाचं (T20 World Cup 2021) यजमानपद भारत अर्थात बीसीसीआयकडे (BCCI) असतानाही कोरोनाच्या संकटामुळे सामने युएई आणि ओमान या देशात खेळवले जात आहेत. आयसीसी आणि बीसीसीआयने मिळून हा निर्णय घेतला आहे. सध्या ग्रुप स्टेजसचे सामने संपले असून त्यातून बांग्लादेश, श्रीलंका, नामिबीया आणि स्कॉटलंड हे संघ सुपर 12 मध्ये गेले आहेत. भारतीय संघाचा (Indian Cricket team) विचार करता भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (india vs pakistan) असणार आहे. दरम्यान भारताचे सामने सुरु होण्यापूर्वी भारतीय खेळाडू आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी काही सल्ले देत भारतीय संघाला काही गोष्टींची काळजी घेण्यास सांगितले आहे.

अजिंक्यने इंडिया टुडेच्या सलाम क्रिकेट शोमध्ये माहिती देताना सांगितले की, यूएईत होणाऱ्या सामन्यांमधील विजय आणि पराभवात Dew अर्थात दवबिंदूचा मोठा हात असू शकतो. मागील काही सराव सामने तसेच ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात सातत्याने दव पडल्यामुळे चेंडूच्या हालचाली ही बदलेल्या दिसून येत आहेत. सुरुवातीला फलंदाजाला मोठे शॉट खेळण्यात अडचणी येत होत्या. पण दव पडताच चेंडूवरील गोलंदाजाची ग्रीप अर्थात पकड कमी झाल्याने मोठे शॉट खेळणं सोप झालं आहे. त्यामुळे या सामन्यात नाणेफेक जिंकून वातावरणाच्या हिशोबाने निर्णय़ घेणं योग्य असल्याचं मत रहाणेने दिलं आहे.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून स्कॉटलंड आणि नामिबीया हे दोन संघही याच ग्रुपमध्ये आले आहेत. या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध स्कॉटलंड  (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध नामिबीया (8 नोव्हेंबर)

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दिपक चहर

हे ही वाचा-

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का

T20 World Cup: पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज भारतासाठी धोका, रोहित-विराटची मोठी कसोटी

(Indian Batman ajinkya rahane Says in World Cup t20 matches Toss will play important role due to Dew)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.