T20 World Cup: पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज भारतासाठी धोका, रोहित-विराटची मोठी कसोटी

भारतीय संघाने दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवला असून आता भारतीय खेळाडू थेट विश्वचषकातील पहिल्या सामन्यातचं मैदानात उतरतील. 24 ऑक्टोबर रोजी हा सामना असून यावेळी पाकिस्तानचा संघ भारतासमोर असणार आहे.

T20 World Cup: पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज भारतासाठी धोका, रोहित-विराटची मोठी कसोटी
पाकिस्तान क्रिकेट संघ

दुबई: टी-20 विश्वचषकासाला (T20 World Cup) दणक्यात सुरुवात झाली आहे. ग्रुप स्टेजसमधील सामने जवळपास संपले असून बांग्लादेश, श्रीलंका आणि स्कॉटलंड हे सुपर 12 मधील 3 संघही आपल्या समोर आले आहेत. पण भारतीयांसाठी मात्र खऱ्या अर्थाने विश्वचषकाची सुरुवात रविवारी अर्थात 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. याच दिवशी भारताचा पहिलाच विश्वचषकातील सामना होणार आहे. विशेष म्हणजे भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (India vs Pakistan) संघाशी होणार आहे. या सामन्यांना दोन्ही संघ सज्ज झाले असून विजयासाठी दोघेही शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की! सध्या भारतीय संघ चांगल्या लयीत आहे. भारतीय फलंदाज उत्तम फॉर्ममध्ये असले तरी पाकिस्तानचा एक गोलंदाज हा भारतीयांसाठी डोकेदुखी ठरु शकतो. खास करुन भारताचे मुख्य फलंदाज विराट, रोहित आणि सूर्यकुमार यांच्यासाठी हा मोठा धोका आहे

तर हा खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा आघाडीचा डावखुरा गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi). 21 वर्षीय या डावखुऱ्या गोलंदाजाने मागील काही वर्षात स्वत:ला संघाचा मुख्य गोलंदाज बनवलं आहे. त्याची उत्तम वेगवान गोलंदाजी चांगल्या चांगल्या फलंदाजाना तंबूत धाडते. त्यामुळे संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्यात अव्वल असणारा शाहीन भारतासाठीही मोठा धोका आहे.

डावखुरा गोलंदाज भारतीयासांठी धोका

शाहीन हा मोठा धोका असण्यामागील कारण म्हणजे तो एक डावखुरा गोलंदाज आहे. दरम्यान भारताची टॉप ऑर्डर डावखुऱ्या गोलंदाजासमोर लगेचच गुडघे टेकते. मग तो रोहित शर्मा असो किंवा विराट कोहली. विशेष म्हणजे रोहित शर्मा 3-4 नाही तर 13 वेळा डावखुऱ्या गोलंदाजासमोर बाद झाला आहे. तर विराट आणि सूर्यकुमार हेही शाहीनसारख्या वेगवान गोलंदाजासमोर बाद होण्याची खूप शक्यता आहे. कारण विराट 9 आणि सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये 10 वेळा वेगवान गोलंदाजासमोर तंबूत परतला आहे. भारताला पाकविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनेच विराट-रोहितसारखे मोठे विकेट मिळवले होते.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य पाकिस्तानी संघ – बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह अफरीदी, हसन हली आणि हारिस रऊफ.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

हे ही वाचा-

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

T20 World Cup च्या 2 सराव सामन्यात केवळ 1 धाव, डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म आयपीएलमधील वर्तवणुकीमुळे गेला?

पाकिस्तानला तर आपला विराट एकटाच पुरुन उरतो, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील आकडेवारी पाहाच!

(Pakistan bowler shaheen afridi is biggest threat for team india in World cup 2021 match)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI