T20 World Cup 2021 : दुबईत विराट अनुष्काचा लेकीसोबत ब्रेकफास्ट, फोटो शेअर करताना ‘तो’ नियम पाळलाच!

आज (बुधवारी) सकाळी कर्णधार विराट कोहली आपली पत्नी अनुष्का आणि लेक वामिकासोबत ब्रेकफास्टसाठी पोहोचला. ब्रेकफास्ट करतानाचा सुंदर फोटो त्याने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत स्वत: कोहली, अनुष्का आणि छोटी परी वामिका दिसत आहेत. पण फोटो शेअर करताना विराटने नेहमीसारखीच काळजी घेतली आहे.

T20 World Cup 2021 : दुबईत विराट अनुष्काचा लेकीसोबत ब्रेकफास्ट, फोटो शेअर करताना 'तो' नियम पाळलाच!
दुबईत विराट अनुष्काचा लेकीसोबत ब्रेकफास्ट
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 2:41 PM

T20 World Cup 2021 :  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली टी -20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने दुबईमध्ये आहेत. भारताची पहिलीच मॅच पाकिस्तान सोबत आहे. पाकिस्तानबरोबर मॅच असल्याने भारताचे खेळाडू जीव तोडून मेहनत करत आहेत. तत्पूर्वी आज (बुधवारी) सकाळी कर्णधार विराट कोहली आपली पत्नी अनुष्का आणि लेक वामिकासोबत ब्रेकफास्टसाठी पोहोचला. ब्रेकफास्ट करतानाचा सुंदर फोटो त्याने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत स्वत: कोहली, अनुष्का आणि छोटी परी वामिका दिसत आहेत. पण फोटो शेअर करताना विराटने नेहमीसारखीच काळजी घेतली आहे.

सुंदर क्षण शेअर केला पण कटाक्षाने नियम पाळलाच!

विराट कोहलीने ट्विटरवर अनुष्का आणि वामिकासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत दुबईतील कुठल्याशा एका हॉटेलमध्ये कोहली कुटुंब नाश्त्यासाठी पोहोचलं होतं. विराट आणि अनुष्का अगदी समोरासमोर बसले होते तर वामिकाचा चेहरा दिसू नये, म्हणून फोटो पाठमोरा काढला गेला. ज्यामध्ये विराट आणि अनुष्का दिसत आहेत. पण वामिकाचा चेहरा दिसत नाही. म्हणजेच नेहमीप्रमाणे वामिकाचा चेहरा फोटोत दिसणार नाही, याची पुरेपूर काळजी विराट-अनुष्काने घेतली आहे.

क्षणभर विश्रांती!

येत्या 23 ऑक्टोबर रोजी भारताचा पाकिस्तानशी हाय व्होल्टेज सामना होतो आहे. प्रेक्षकांसहित खेळाडूंवरही या सामन्याचं दडपण आहे. सगळेच खेळाडू नेटमध्ये कसून सराव करतायत. पण जरासा तणाव दूर करण्यासाठी विराट आपल्या कुटुंबाला घेऊन नाश्यासाठी पोहोचला. विराटने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनीही या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

भारत पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज लढत

भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी (India vs Pakistan) 24 ऑक्टोबर रोजी असून दोघांनी सराव सामन्यात तगडा विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला 7 विकेट्सने तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजला 7 विकेट्सने पराभूत केलं आहे.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य पाकिस्तानी संघ – बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह अफरीदी, हसन हली आणि हारिस रऊफ.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

(indian Captain Virat kohli Share Photo With Anushka Sharma and daughter Vamika Breakfast Time Dubai)

हे ही वाचा :

T20 World Cup 2021 : विराटच्या नशिबी अपयशच येणार, आमचाच संघ वर्ल्डकप जिंकणार, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

T20 World Cup 2021: 33 शतकं लगावली, विश्व-चषकही जिंकवून दिला, आता फॉर्म नसल्यामुळे स्वत:च अंतिम 11 मधून बाहेर पडणार

T20 World Cup साठी भारतीय संघाची रणनीती ठरली, अशी असेल टीम इंडिया, काय म्हणाले रवी शास्त्री?

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.