CT 2025 : रोहितसेनेची चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरी, टीम इंडियाने काय काय विक्रम केले?
Team India Icc Champions Trophy 2025 Explainer : टीम इंडियाने सलग 5 सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड केला. तसेच असंख्य विक्रम केले. जाणून घ्या.

भारतीय क्रिकेट संघाने गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनात आणि रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 9 मार्च रोजी न्यूझीलंडला अंतिम सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केलं. टीम इंडियाने यासह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (CT 2025) जिंकली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेत अंतिम फेरीसह एकूण 5 सामने खेळले आणि ते जिंकलेही. थोडक्यात सांगायचं तर टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य राहिली. भारतासाठी प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी निर्णायक भूमिका बजावली. स्पर्धेतील 5 सामन्यांमध्ये 4 वेगवेगळे खेळाडू हे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले. विराट कोहली याने 2, तर रोहित, उपकर्णधार शुबमन गिल आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी 1-1 वेळेस हा पुरस्कार जिंकला. ...