भारताचे सहा फलंदाज शून्यावर बाद, 108 धावांवर 9 विकेट्स, इंग्लंडचा ‘तो’ तगडा विजय

भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर (England Tour) आहे. पूर्वीपासूनच भारताला इंग्लंडमध्ये विजयासाठी फार मेहनत करावी लागते.

भारताचे सहा फलंदाज शून्यावर बाद, 108 धावांवर 9 विकेट्स, इंग्लंडचा 'तो' तगडा विजय
2014 मध्ये इंग्लंड कसोटीत भारताचा पराभव

भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या इंग्लड दौऱ्यावर (England Tour) आहे.  2007 नंतर इंग्लंडच्या भूमित पहिल्यांदा विजय मिळवण्याच्या तयारीत आहे. मागील तिनही दौऱ्यात भारतीय संघाला इंग्लंडमध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. यातीलच एक पराभव म्हणजे 2014 साली झालेल्या कसोटी मालिकेतील लाजिरवाणा पराभव. या दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी मालिकेत 3-1 ने पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेतील चौथा सामना आजच्याच दिवशी खेळवला गेला होता. यावेळी महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला एक डाव आणि 54 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

सामन्यात पहिल्याच दिवशी भारताला अवघ्या 8 धावांवर चार विकेट गमवावे लागले होते. त्यानंतर पुन्हा सामन्यात भारतीय संघाला पुनरागमन करता आले नाही आणि तिसऱ्या दिवशीच भारताने इंग्लंडसमोर गुढघे टेकत पराभव स्विकारला. ज्यामुळे इंग्लंडने मालिकेत 2-1 ची आघाडी घेतली. हा सामना ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर खेळवला गेला होता. ज्यात धोनीने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. पण हा निर्णय चूकला आणि जेम्स एंडरसनसह स्टुअर्ट ब्रॉडने मिळून भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे नष्ट केली. अवघ्या 8 धावांवर भारताचे गेलेल्या चार विकेटमध्ये मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली तर शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर शेवटच्या फळीत जाडेजा आणि भुवनेश्वर कुमारही खातं न खोलताच बाद झाले होते. त्यावेळी धोनीने 71 आणि रविचंद्रन अश्विनने 40 धावा करत डाव सांभाळला. रहाणेने केलेल्या 24 धावांच्या जोरावर भारतीय संघ 152 धावा करु शकला. इंग्लंडकडून ब्रॉडने 25 धावा देत 6 विकेट घेतले.

108 धावांमध्ये भारताचे 9 गडी तंबूत परत

भारताच्या पहिल्या डावानंतर इंग्लंडकडून फलंदाजी करताना  जो रूटने 77 आणि जॉस बटलरने 70 धावा केल्या. तर  इयान बेलने 58 धावाकरत इंग्लंडचा स्कोर 367 पर्यंत नेला. ज्यामुळे इंग्लंडला 215 धावांची बढत मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावांत मात्र भारताची परिस्थिती आणखी खराब झाली. सुरुवातीला 53 धावांपर्यंत भारताची एकच विकेट पडली होती. पण त्यानंतर इंग्लंडने तुफान पुनरागमन करत 108 धावांमध्ये 9 विकेट पाडले.  मोईन अलीने 39 धावांत 4 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे भारताचा डाव 161 धावांवर आटोपला आणि एक डाव 54 धावांनी भारत पराभूत झाला.

इतर बातम्या

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

एबी डिव्हिलियर्सवर रबाडाबरोबर वांशिक भेदभाव केल्याचा आरोप, खुद्द एबीडीचं स्पष्टीकरण, म्हणतो…

IND vs ENG : 24 तासांच्या खेळात सिराजची इंग्लंडच्या खेळाडूंशी दुसऱ्यांदा वादावादी, कोहलीच्या मध्यस्थीनंतर सिराज शांत, VIDEO

 

(Indian Cricket team lost to england by 54 run in old trafford test on this day in 2014)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI