IPL चॅम्पियनसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद! T20 World cup साठी अशा खेळाडूंवर नजर

भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket Team) 2013 नंतर एकही आयसीसी स्पर्धा (ICC Championship) जिंकलेली नाही. टीम इंडिया अनेकदा विजयाच्या जवळ आली. पण त्यांना यश मिळालं नाही.

IPL चॅम्पियनसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद! T20 World cup साठी अशा खेळाडूंवर नजर
team india
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 10:21 AM

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket Team) 2013 नंतर एकही आयसीसी स्पर्धा (ICC Championship) जिंकलेली नाही. टीम इंडिया अनेकदा विजयाच्या जवळ आली. पण त्यांना यश मिळालं नाही. मागच्यावर्षी आय़सीसी 2021 विश्वचषक स्पर्धेत संघाने खूपच खराब प्रदर्शन केलं. साखळी फेरीचा टप्पाही ओलांडता आला नव्हता. गेल्यावेळचं अपयश या विश्वचषकात (World cup) धुवून काढण्याचा टीम इंडिया प्रयत्न असेल. टी 20 मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तसंच या फॉर्मेट मध्ये पुढची काही वर्ष संघाचा भाग असणाऱ्या खेळाडूंना निवडी मध्ये प्राधान्य दिलं जात आहे. यामुळे काही खेळाडूंना चांगली कामगिरी करुनही संघात स्थान मिळणार नाही. यात एक नाव आहे, मोहम्मद शमीचं.

त्याची धुलाई झाली, त्याला यश मिळालं नाही

मोहम्मद शमी भारताच्या कसोटी संघाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. त्याने गरज असताना, संघाला विकेट मिळवून दिल्या आहेत. अचूक टप्पा आणि दिशा मोहम्मद शमीच्या गोलंदाजीच वैशिष्ट्य आहे. पण हाच शमी टी 20 चे फारच कमी सामने खेळलाय. मागच्या दोन आयपीएल सीजन मध्ये शमीने आपल्या कामगिरीने प्रभावित केलं. 2021 आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे त्याची टी 20 वर्ल्ड कप संघात निवड झाली. पण तिथे शमी अपयशी ठरला. त्याची धुलाई झाली. त्याला यश मिळालं नाही. आता आयपीएल 2022 मध्ये पुन्हा त्याने जबरदस्त प्रदर्शन केलं. गुजरात टायटन्सला आयपीएलचं जेतेपद मिळवून देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली.

मोहम्मद शमी पुन्हा तरुण होणार नाही

असं वाटलं होतं की, शमीला पुन्हा वर्ल्ड कप साठीच्या संघात स्थान मिळेल. पण निवड समिती सदस्य पूर्णपणे वेगळा विचार करतात. त्यांनी शमीसाठी टी 20 वर्ल्ड कपचे दरवाजे जवळपास बंद करुन टाकले आहेत. युवा खेळाडूंवर निवड समितीच लक्ष आहे, असं इनसाइट स्पोर्ट्ने एका निवड समिती सदस्याच्या हवाल्याने म्हटलं आहे. “मोहम्मद शमी पुन्हा तरुण होणार नाही. आम्हाला त्याला कसोटी सामन्यांसाठी फ्रेश ठेवायचं आहे. त्यामुळे तो टी 20 संघात नाहीय. आम्ही शमी बरोबर वर्कलोड मॅनेजमेंट बद्दलही चर्चा केलीय. सध्या तो टी 20 योजनेचा भाग नाहीय. सर्व लक्ष युवा खेळाडूंवरच आहे” असं निवड समिती सदस्याने सांगितलं.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.