AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs AUSW : कसोटीच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणाची कमाल

कसोटीत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आता भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना होत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा वरचष्मा दिसला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 219 धावांवर बाद केला. तसेच भारताने एक गडी बाद 98 धावा केल्या आहेत.

INDW vs AUSW : कसोटीच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणाची कमाल
INDW vs AUSW : कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाची सरशी, ऑस्ट्रेलियन महिला संघ बॅकफूटवर
| Updated on: Dec 21, 2023 | 7:29 PM
Share

मुंबई : भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाशी कसोटी सामना सुरु आहे. कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताची मजबूत पकड दिसून आली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या षटकातच फोइबे लिचफिल्डला बाद करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. बेथ मूने आणि तहिला मॅग्राने चांगली भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 219 धावा केल्या. त्या प्रत्युत्तरात भारताने दिवसअखेर एक गडी गमवून 98 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही 121 धावांची आघाडी आहे. पण स्मृती मंधाना आणि स्नेह राणा मैदानात असल्याने ही धावसंख्या सहज गाठून आघाडी घेईल, अशी अपेक्षा आहे. स्मृती मंधाना नाबाद 43 आणि स्नेह राणा नाबाद 4 धावांवर खेळत आहे. तर शफाली वर्मा 40 धावांवर असताना जेस जोनासेनच्या गोलंदाजीवर तंबूत परतली.

ऑस्ट्रेलियाचा डाव

बेथ मूने आणि फोइबे लिचफिल्ड ही जोजी मैदानात उतरली होती. पण फोईबे डायमंड डकवर बाद झाली. एकही चेंडू न खेळता धावचीत झाली. त्यानंतर आलेली एलिसा पेरीही काही खास करू शकली नाही. अवघ्या 4 धावांवर बाद झाली. त्यानंतर बेथ आणि तहिला मॅग्रा यांनी डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी केली. मॅग्राने अर्धशतकी खेळी केली पण त्यानंतरच्या चेंडूवर स्नेह राणाने तिला तंबूचा रस्ता दाखवला. बेथने एलिसा हीलीसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. पण 40 धावांवर असताना पूजा वस्त्राकारने बाद केलं.

एलिसा हीली 38, अन्नाबेल सुथरलँड 16, एशले गार्डनर, जेस जोनासेन 19, एलाना किंग 5, लॉरेन चिटल 6 धावांवर बाद झाले. तर किम गार्थ ही नाबाद 28 धावांवर राहिली. भारताकडून पूजा वस्त्राकारने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर स्नेह राणाने 3 आणि दीप्ती शर्माने 2 गडी बाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मूनी, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), एनाबेल सुथरलँड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, एलाना किंग, किम गर्थ, लॉरेन चीटल

कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.