IPL 2021 : धोनीच्या नेतृत्वात बोलर्सला खेळायला का आवडतं?, चेन्नईच्या करोडपती खेळाडूने सांगितली ‘राज की बात’!

फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग्जने कृष्णप्पा गौतमला 9.25 करोड रुपयांना खरेदी केलं आहे.

IPL 2021 : धोनीच्या नेतृत्वात बोलर्सला खेळायला का आवडतं?, चेन्नईच्या करोडपती खेळाडूने सांगितली 'राज की बात'!
MS Dhoni
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 6:43 AM

मुंबई : येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चेलेंजर्स बंगळुरु (Royals Challenge Banglore) यांच्यात चेपॉक स्टेडियमवर पहिलाच सामना खेळवला जाणार आहे.. त्याअगोदर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात बोलर्सला खेळायला का आवडतं?, या प्रश्नाचं उत्तर चेन्नईचा करोडपती बोलर कृष्णप्पा गौतम (krishnappa Gowtham) याने उलगडून सांगितलं आहे. (IPL 2021 Chennai Super Kings Bowlers Playing Under MS Dhoni Says krishnappa Gowtham)

फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग्जने कृष्णप्पा गौतमला 9.25 करोड रुपयांना खरेदी केलं आहे. अशा प्रकारे आयपीएल लीगच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वांत महागडा अनकॅप्ड खेळाडू बनला. इतकी मोठी किंमत मिळाल्यावर साहजिकच खेळाडूला खेळण्याच्या अगोदर दबाव येतो. त्यात आयपीएलच्या 13 व्या मोसमात पंजाबकडून त्याने केवळ 2 मॅचेस खेळल्या.

धोनीला गोलंदाजांची ताकद माहितीय

महेंद्रसिंग धोनीच्या पाठीमागे जागतिक क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. त्याच्या कर्णधार असण्याने अनेकांचं काम सोपं होतं. त्याला गोलंदाजांची ताकद माहितीय. कोणत्या वेळी कोणता बोलर वापरायचा आणि कोणच्या बोलरकडून कोणतं काम करवून घ्यायचं, हे धोनीला पक्क ठाऊक आहे. त्याचमुळे बोलर्सला धोनीच्या नेतृत्वात खेळायला आवडतं.

धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणं माझ्यासाठी एका स्वप्नासारखं आहे. इतकंच नाही तर धोनीच्या नेतृत्वात खेळताना माझ्यावर कोणताच दबाव असणार नाही आणि याचमुळे माझ्याकडून हंगामात चांगलं प्रदर्शन होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.

चेन्नईच्या खेळाडूंना दबावात खेळणं पसंत नाही. कारण कर्णधार म्हणून धोनी कधीच कुणावर प्रेशर आणत नाही. प्रत्येकाला त्याच्या शैलीत आणि अंदाजात खेळण्याची संधी धोनी देतो. त्याचमुळे संबंधित खेळाडूकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असते, असं कृष्णप्पा म्हणाला.

चेन्नईचा पहिला सामना 10 एप्रिलला

एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईला तीन वेळा जेतेपदाला गवसणी घातलीय. पाठीमागचा हंगाम टीमसाठी फार वाईट गेला. अगदी लीग स्पर्धेत चेन्नईला गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र यावेळी चेन्नईचे सगळेच खेळाडू कसून सराव करत आहेत. 10 एप्रिलला चेन्नईचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

(IPL 2021 Chennai Super Kings Bowlers Playing Under MS Dhoni Says krishnappa Gowtham)

हे ही वाचा :

IND vs ENG : सॅम करनच्या जबरदस्त खेळीमागे महेंद्रसिंह धोनीचा हात?

ग्राऊंडवर साडे 6 फुट उंचीच्या बोलरचं वादळ, 40 रनवर 8 विकेट गेल्यानं इंग्लंडच्या टीमचं सरेंडर

Dan Christian IPL 2021 RCB Team Player : ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल क्रिस्चियनच्या समावेशाने बंगळुरुची टीम भक्कम

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.