IPL 2021 DC vs CSK Live Streamimg : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 DC vs CSK Live Streamimg : दिल्ली कॅपिटल्स  विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सामना कधी, कुठे, केव्हा?
CSK vs DC live Streaming

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super kings) आणि दिल्ली कॅपिटलमध्ये (Delhi Capitals) होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. | Chennai Super kings vs Delhi Capitals

Akshay Adhav

|

Apr 10, 2021 | 1:02 PM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super kings) आणि दिल्ली कॅपिटलमध्ये (Delhi Capitals) या उभय संघांमध्ये खेळला जाईल. दिल्ली कॅपिटल्सची टीम गेल्या काही काळापासून खूप चांगलं प्रदर्शन करत आहे. मागील हंगामात श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात संघाने अंतिम फेरी गाठली. मात्र, सध्या श्रेयस अय्यर दुखापतीमुळे यंदाच्या हंगामातून बाहेर पडला आहे. त्यांच्या जागी संघाची धुरा भारताचा उभरता खेळाडू आक्रमक विकेट कीपर बॅट्समन रिषभ पंतकडे (Rishabh Pant) दिली गेली आहे. दिल्लीचा सलामीचाच सामना चेन्नईशी होत असल्साने रिषभची गाठ महेंद्रसिंग धोनीशी (MS Dhoni) पडणार आहे. रिषभ हा धोनीकडे गुरु म्हणून पाहतो. साहजिक त्याला आता आपल्या गुरुला टशन द्यावी लागणार आहे.  (IPL 2021 Chennai Super kings vs Delhi Capitals live Streaming When And Where To watch online Free in marathi)

पाठीमागील मोसमातलं अपयश विसरुन चेन्नई नव्या जोमात, सुरेश रैनाचं पुनरागमन

दुसरीकडे गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचं प्रदर्शन अतिशय खराब राहिलं. आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं की चेन्नईची टीम प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झाली नाही. यावेळी चेन्नईचा संघ पाठीमागील मोसमातलं अपयश मागे ठेवून धडाकेबाज कामगिरी करण्यास सज्ज आहे. चेन्नईसाठी सर्वांत मोठी गोष्ट ही आहे की संघाचा आधारस्तंभ स्टार खेळाडू सुरेश रैना संघात परतला आहे. जो मागील हंगामात वैयक्तिक कारणास्तव खेळू शकला नव्हता.

पंतसाठी मोठा सामना

पंतची तुलना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी बर्‍याच काळापासून केली जात आहे. प्रथमच कर्णधार म्हणून खेळताना पंतच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. तसंच त्याच्यासाठी ही मोठी मॅच असेल. दोन्ही संघांमध्ये एकूण 23 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी दिल्ली संघाने केवळ 8 सामने जिंकले आहेत. चेन्नई संघाने एकूण 15 सामने जिंकले आहेत. साहजिकच इतिहासात डोकावलं असता चेन्नईची टीम वरचढ दिसतीय. मात्र दिल्लीची टीम आता इतिहास बदलण्यास सज्ज झाली आहे.

सामना कधी आणि कुठे…?

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटलमध्ये (Delhi Capitals)यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील दुसरा सामना आज 10 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या बवेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 Chennai Super kings vs Delhi Capitals live Streaming When And Where To watch online Free in marathi)

हे ही वाचा :

IPL 2021 : पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त, रोहितसह विराटही चिंतेत!

IPL 2021 : विराट कोहलीला हरवलेला खेळाडू सापडला, 8 वर्षानंतर कोहिनूर हिरा मैदानात उतरला!

IPL 2021 : मॅक्सवेलचा गगनचुंबी षटकार स्टेडियमच्या बाहेर, विराट कोहलीही हैरान, दिली ‘अशी’ रिअॅक्शन! पाहा व्हिडीओ

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें