IPL 2021 : पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त, रोहितसह विराटही चिंतेत!

टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे. (IPL 2021 Mi vs RCB Hardik Pandya Injured Scare)

IPL 2021 : पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त, रोहितसह विराटही चिंतेत!
हार्दिक पांड्याला दुखापत
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 12:14 PM

चेन्नई :  आयपीएल 2021 च्या (IPL2021) पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अनफिट दिसला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यातील सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना तो नीटपणे थ्रो देखील करु शकत नव्हता. हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. पहिल्या सामन्यात फिल्डिंग करताना तो अंडर आर्म थ्रो करताना दिसला. त्याच्यामुळे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला एकदा जीवनदानही मिळाले. सामन्यादरम्यान असे दोन प्रसंग आले की ज्यावेळी हार्दिककडून थ्रो ची अपेक्षा असताना त्याला थ्रो करणं जमलं नाही. साहजिक यामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे. (IPL 2021 Mi vs RCB Hardik Pandya Injured Scare)

दोन प्रसंग, हार्दिक पांड्या फिट नसल्याचं समोर

हार्दिक पांड्या अनफिट आहे हे सातव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर ठळकपणे जाणवलं. क्रुणाल पंड्याच्या बोलिंगवर विराट कोहलीने खेळपट्टीच्या बाजूला बॉल टोलवला आणि धाव घेण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला इशारा केला परंतु मॅक्सवेलने नकार दिला. याचदरम्यान विराट कोहली क्रीजच्या फार पुढे आला होता. आपण रनआऊट होणार हे कोहलीला किंबहुना लक्षात आलं होतं. बॉल हार्दिक पांड्याकडे गेला होता. मात्र त्याला व्यवस्थित थ्रो टाकता न आल्याने कर्णधार कोहली आरामात क्रीजवर पोहोचला. हार्दिकने जर उत्तम थ्रो मारला असता तर कोहली आऊट झाला असता. कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा दिसला असता.

आरसीबीच्या डावाच्या आठव्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे पुन्हा दिसून आले. राहुल चहरच्या चेंडूवर कोहलीने स्लिप आणि शॉर्ट थर्ड मॅन दरम्यान शॉट मारला. चेंडू हार्दिककडे गेला आणि तो चेंडू वेळेवर फेकू शकला नाही. त्याने पहिल्यांदा रोहितला बॉल फेकला आणि रोहितने मग इशान किशनकडे बॉल फेकला.

बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये अपयशी

मुंबई विरुद्ध बंगळुरु या सलामीच्या सामन्यात हार्दिकची बॅट तळपणार, अशी मुंबईच्या चाहत्यांना आशा होती. मात्र बंगळुरुच्या बोलर्सने मुंबईकर फलंदाजांना त्यातही हार्दिकला मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. हार्दिकने 10 बॉलमध्ये 13 धावा काढल्या. मात्र संधी असताना मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आलं.

(IPL 2021 Mi vs RCB Hardik Pandya Injured Scare)

हे ही वाचा :

IPL 2021 : विराट कोहलीला हरवलेला खेळाडू सापडला, 8 वर्षानंतर कोहिनूर हिरा मैदानात उतरला!

IPL 2021 : मॅक्सवेलचा गगनचुंबी षटकार स्टेडियमच्या बाहेर, विराट कोहलीही हैरान, दिली ‘अशी’ रिअॅक्शन! पाहा व्हिडीओ

IPL 2021 : RCB च्या 7 फूट उंचीच्या बोलर्सने मुंबईकर क्रुणाल पांड्याची बॅट तोडली, फॅन्स म्हणाले, ‘बचके रहेना रे…!’

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.