AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 | गब्बरची जब्बर कामिगिरी, ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाला पछाडत शिखर धवनने रचला इतिहास

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 25 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात दिल्लीच्या शिखर धवनने 46 धावांची खेळी केली.

IPL 2021 | गब्बरची जब्बर कामिगिरी, 'मिस्टर आयपीएल' सुरेश रैनाला पछाडत शिखर धवनने रचला इतिहास
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 25 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात दिल्लीच्या शिखर धवनने 46 धावांची खेळी केली.
| Updated on: Apr 30, 2021 | 5:56 PM
Share

अहमदाबाद | दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर ‘गब्बर’ शिखर धवन (Shikhar Dhawan) आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या (IPL 2021) सुरुवातीपासून दमदार फलंदाजी करतोय. दिल्लीने या हंगामात आतापर्यंत एकूण 5 विजयांची नोंद केली आहे. या विजयात धवनने महत्वाची भूमिका बजावली आहे. गुरुवारी 29 एप्रिलला झालेल्या सामन्यात धवनने कोलकाता विरुद्ध 46 धावांची खेळी केली. या खेळीसह धवनने नवा किर्तीमान केला आहे. धवन ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाला (Suresh Raina) पछाडत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (ipl 2021 dc vs kkr shikhar dhawan overtake suresh raina and become 2nd highest scorers in ipl history)

रैनाला पछाडलं

धवनने कोलकाता विरुद्ध 30 धावा करताच रैनाला पछाडलं. यासह धवन आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. धवनने आतापर्यंत 183 सामन्यात 2 शतक आणि 43 अर्धशतकांसह 34.86 च्या सरासरीने 5 हजार 508 धावा केल्या आहेत. धवनच्या आधी दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना होता. सुरेश रैनाने 199 सामन्यात 5 हजार 489 धावा केल्या आहेत.

पहिल्या क्रमांकावर कोण?

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आहे. विराटने 198 सामन्यात 37.99 च्या सरासरीने 6 हजार 41 धावा केल्या आहेत. विराटने नुकतेच आयपीएलमध्ये 6 हजार धावांचा टप्पा ओलांडला.

कोलकातावर 7 विकेट्सने शानदार विजय

दिल्लीने नाणेफेक जिंकली. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला विजयासाठी 155 धावांचे आव्हान दिले. हे विजयी आव्हान दिल्लीने 16.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केल. शिखर धवनने या सामन्यात 47 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. यासह धवनने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप पटकावली. या मोसमात धवनच्या नावे 7 सामन्यात 44.43 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत.

पृथ्वीची धमाकेदार खेळी

दिल्लीचा युवा सलामवीर पृथ्वी शॉ दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. पृथ्वीने 41 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसत तब्बल 200.00 च्या स्ट्राईक रेटने दमदार 82 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पृथ्वीने या मोसमातील 18 चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावलं. तसेच त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये शिवम मावीच्या गोलंदाजीवर 6 चौकार लगावले.

दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर

दिल्लीने कोलकाताला पराभूत करत पॉइंट्स टेबलमध्ये बंगळुरुला पछाडत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. या सामन्याआधी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर होती. दिल्लीने या मोसमातील 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 2 वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

संबंधित बातम्या :

RCB vs PBKS IPL 2021 Match Prediction | फलंदाजांची सातत्याने निराशाजनक कामगिरी, पंजाबच्या किंग्ससमोर बंगळुरुचं मजबूत आव्हान

IPL 2021 PBKS vs RCB Live Streaming : पंजाब विरुद्ध बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?

(ipl 2021 dc vs kkr shikhar dhawan overtake suresh raina and become 2nd highest scorers in ipl history)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.