IPL 2021 : स्टेडियममध्ये बसलेली ही मुलगी कोण?, जिच्यासमोर षटकार मारताच राहुल चहर रागाने लालबुंद झाला!

राजस्थानच्या विरुद्धच्या सामन्यात राहुल चहरला पाठिंबा देण्यासाठी किंबहुना सपोर्ट करण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड इशानी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर उपस्थित होती. (IPL 2021 Mi vs RR didnt like Rahul Chahar hitting a six in front of Girlfriend Ishani)

IPL 2021 : स्टेडियममध्ये बसलेली ही मुलगी कोण?, जिच्यासमोर षटकार मारताच राहुल चहर रागाने लालबुंद झाला!
राहुल चहरची गर्लफ्रेंड इशानीने त्याला सपोर्ट करायला मैदानात उपस्थिती लावली होती.
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 10:46 AM

नवी दिल्ली : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) 24 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला (Mumbai Indians vs Rajasthan Royals) 7 विकेट्सने पराभूत केलं. या सामन्यात मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने (Rahul Chahar) शानदार गोलंदाजी केली. त्याने राजस्थानच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. याच मॅचमध्ये असा एक प्रसंग पाहायला मिळाला जेव्हा राहुल चहरचा चेहरा रागाने लालबुंद झाला! तो प्रसंग नेमका कोणता होता, हे आपण पाहूयात… (IPL 2021 Mi vs RR didnt like Rahul Chahar hitting a six in front of Girlfriend Ishani)

राहुलला पाठिंबा द्यायला गर्लफ्रेंड इशानीची उपस्थिती

आयपीएलच्या मॅचेसमध्ये खेळाडूंना पाठिंबा द्यायला त्यांच्या गर्लफ्रेंड, पत्नी, कुटुंबीय उपस्थिती लावत असतात. राजस्थानच्या विरुद्धच्या सामन्यात राहुल चहरला पाठिंबा देण्यासाठी किंबहुना सपोर्ट करण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड इशानी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर उपस्थित होती.

यशस्वी जयस्वालने षटकार मारला आणि राहुलचा तिळपापड झाला…!

मुंबईकडून दहावी ओव्हर टाकायला राहुल चहर बोलिंग मार्कवर आला. त्याच्या तिसऱ्या बॉलवर राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने जवळपास 90 मीटरचा षटकार ठोकला. राहुलची गर्लफ्रेंड इशानीच्या समोर यशस्वी जयस्वालने एवढा लांब षटकार ठोकलेला राहुलला आवडलं नाही. परंतु त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर राहुलने जयस्वालला तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी मात्र राहुलने विकेटचं मनसोक्त सेलिब्रेशन केलं आणि अगोदर खाल्लेल्या षटकाराची विकेटने वसूली केली.

गर्लफ्रेंड खूश, राहुल चहरला काय करु आणि काय नको असं झालं…!

आपल्या गर्लफ्रेंड समोर राहुलने तिसऱ्या बॉलवर षटकार खाल्ला आणि पाचव्या बॉलवर विकेट काढली, असा झटपट प्रवास राहुल चहरने केला. जयस्वालने राहुलला एवढा लांब षटकार मारलेला पाहताच इशानीचा चेहरा पडला. मात्र पाचव्या बॉलवर राहुलने जयस्वालचा ‘यशस्वी’पणे काटा काढला. हे पाहून इशानीच्या चेहऱ्यावर हसू खुललं. इशानीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून राहुलला खूप आनंद झाला होता.

मुंबईची राजस्थानवर मात

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या लढतीत मुंबईने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. मुंबईने हे लक्ष्य 3 विकेट्स गमावून सहज पार केलं. मुंबईकडून सलामीवीर क्विंटन डिकॉकने शानदार अर्धशतकी खेळी केली.

(IPL 2021 Mi vs RR didnt like Rahul Chahar hitting a six in front of Girlfriend Ishani)

हे ही वाचा :

IPL 2021 : चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने पत्नीला किस केलं, जहीर खानच्या बायकोने फोटो ट्विट केला अन्….

IPL 2021 : गेल डिव्हिलियर्सला विसराल, विराट कोहलीविरुद्ध पदार्पण करणार हे 100 नंबरी सोनं!

IPL 2021 : सलग 6 बॉलवर 6 चौकार खाल्ल्यानंतर शिवम मावीने दाबला पृथ्वी शॉ चा गळा!

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.