AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : मुंबई इंडियन्सविरोधात भर मैदानात बेयरस्टोचं खळ्ळखटॅक, बघा खतरनाक Video

बेअरस्टो आणि वॉर्नरने डावाची सुरुवात केली जी आक्रमक, बिनधास्त आणि लाजवाब होती. चेन्नईच्या मैदानावर तर बेअरस्टो असा बरसत होता जसं त्याच्या घरचं मैदान आहे. (IPL 2021 MI vs SRH Jonny bairstow Six Breaks the Glass of Refrigerator) 

IPL 2021 : मुंबई इंडियन्सविरोधात भर मैदानात बेयरस्टोचं खळ्ळखटॅक, बघा खतरनाक Video
जॉनी बेअरस्टोची वादळी खेळी....
| Updated on: Apr 18, 2021 | 8:32 AM
Share

चेन्नई :  आयपीएलच्या 14 पर्वातील (IPL 2021) सनरायजर्स हैदराबादला (Sunrisers Hydrabad) आणखीही विजयाची चव चाखता आलेली नाही. सलग तिसऱ्या सामन्यात वॉर्नरच्या नेतृत्वाखालील (David Warner) ऑरेंज आर्मीचा पराभव झाला आहे. सुरुवातीच्या दोन मॅचेस थोड्याशा अंतराने गमावल्यानंतर मुंबईविरुद्धच्या (Mumbai Indians) सामन्यात पूर्ण ताकदीने हैदराबादची टीम मैदानात उतरली होती. कर्णधार वॉर्नरनेही 4 बदल करुन सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच, असा चंग बांधला होता. वृद्धीमान साहा (wriddhiman saha) डेव्हिड वॉर्नर (David warner) ही सलामी जोडी दोन सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर शनिवारी रात्री बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि वॉर्नरने डावाची सुरुवात केली जी आक्रमक, बिनधास्त आणि लाजवाब होती. चेन्नईच्या मैदानावर तर बेअरस्टो असा बरसत होता जसं त्याच्या घरचं मैदान आहे. जसं त्याला त्या मैदानावरचा कानाकोपरा माहिती आहे. त्याच्या एका षटकाराने तर कमाल केली. खेळाडूंना कोल्ड्रिंक्स आणि पाणी ठेवलेल्या फ्रीजची काच त्याने आपल्या षटकाराने फोडली. (IPL 2021 MI vs SRH Jonny bairstow Six Breaks the Glass of Refrigerator)

चेन्नईच्या मैदानात बेअरस्टोचं वादळ, वॉर्नरच्या साथीने आक्रमक सुरुवात

मुंबईने हैदराबादला 151 धावांचं लक्ष्य दिलं होतं. वॉर्नरच्या साथीने बेअरस्टोने हैदराबादच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. मुंबईचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टवर त्याने आक्रमक केलं. बोल्टच्या दुसऱ्या आणि डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये बेअरस्टोने त्याला तीन सणसणीत चौकार लगावले तर एक शानदार षटकार खेचला. केवळ 29 चेंडूत हैदराबादने आपलं अर्धशतक धावफलकावर लावलं होतं.

बेअरस्टोच्या षटकाराने फ्रीजची काच फोडली!

बेअरस्टोने बोल्टच्या ओव्हरच्या पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर शानदार चौकार लगावले. यानंतर तिसऱ्या बॉलवर त्याने ऑफ साईडला 99 मीटर्सचा धडाकेबाज सिक्सर लगावला. तो सिक्सर एवढा शानदार आणि जबरदस्त होता की डगआऊट जवळ ठेवलेल्या फ्रीजची काच फुटली. डगआऊट जवळ काचांचा खच पडला. बेअरस्टोने मारलेला षटकार पाहून डग आऊटमध्ये बसलेले खेळाडू आश्चर्यचकित झाले.

बेअरस्टोची खेळी व्यर्थ, मुंबईचा 13 धावांनी विजय

बेअरस्टोचा आक्रमक अंदाज पाहून 12 ते 15 ओव्हरमध्ये हैदराबाद मुंबईला पराभूत करेल, असं वाटत होतं. मात्र बेअरस्टोची ही खेळी व्यर्थ गेली. 151 धावांचं टार्गेट हैदराबादला पेलवलं नाही. 19.4 ओव्हर्समध्ये हैदराबादचा डाव 137 धावांवर ऑलआऊट झाला. मुंबईविरुद्धच्या पराभवासह हैदराबादने सलग तिसरा सामना गमावला. मुंबईने हा सामना 13 रन्सने जिंकला.

(IPL 2021 MI vs SRH Jonny bairstow Six Breaks the Glass of Refrigerator)

हे ही वाचा :

MI vs SRH, IPL 2021 Match 9 Result | हैदराबादचा सलग तिसरा पराभव, मुंबईचा 13 धावांनी शानदार विजय

IPL 2021 : हार्दिक पांड्याच्या ‘रॉकेट थ्रो’ने हैदराबादच्या स्वप्नांचा चक्काचूर, इथेच फासा पलटला, पाहा व्हिडीओ…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.