RR vs CSK : अबू धाबीत ऋतुराजचं वादळी शतक, राजस्थानची दाणादाण, 9 चौकार 5 षटकारांची आतषबाजी

IPL 2021 स्पर्धेत आज अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये खेळवला जात आहे.

RR vs CSK : अबू धाबीत ऋतुराजचं वादळी शतक, राजस्थानची दाणादाण, 9 चौकार 5 षटकारांची आतषबाजी
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 10:51 PM

अबू धाबी : IPL 2021 स्पर्धेत आज अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय चेन्नईच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीने 47 धावांची भागीदारी करत चेन्नईला चंगली सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या मोईन अली, सुरेश रैना आणि अंबाती रायुडूला फार चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र सलामीवीर ऋतुराज गायकवाडने राजस्थानच्या गोलंदाजांची यथेच्च धुलाई सुरुच ठेवली. (IPL 2021, RR vs CSK : Ruturaj Gaikwad Hits His Maiden IPL Century)

अखेरच्या काही षटकांमध्ये ऋतुराजला रवींद्र जाडेजाने चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 22 चेंडूत नाबात 55 धावांची भागीदारी रचली. या दरम्यान ऋतुराज गायकवाडने आयपीएल कारकिर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. त्याने 60 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. रवींद्र जाडेजानेदेखील 15 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी केली. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकांमध्ये 189 धावांचा डोंगर उभा केला आहे.

राजस्थानसाठी कोणत्याही परिस्थितीत आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. जर आज संजू सॅमसनचा संघ हरला, तर त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात येतील. संघाचे सध्या केवळ 8 गुण आहेत आणि हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफसाठी पात्र ठरली असून संघ पहिल्या स्थानावर आहे. या विजयासह, गुणतालिकेत टॉप 2 मध्ये राहण्याची त्यांची दावेदारी आणखी मजबूत होईल, ज्यामुळे संघाला प्लेऑफमध्ये मदत होईल. संजूच्या संघाला प्लेऑफसाठीचं आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर आता 190 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल.

गेल्या वर्षी पदार्पण

गायकवाडने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला कोरोना झाल्यामुळे तो उशिरा संघात आला. त्याची सुरुवातही चांगली नव्हती पण नंतर गेल्या मोसमातील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये त्याने सलग तीन अर्धशतके ठोकली. या मोसमातही त्याची चांगली सुरुवात झाली नाही. या हंगामाच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये गायकवाडच्या बॅटमधून 5, 5, 10 धावा आल्या. पण संघ व्यवस्थापनाने त्याला पाठिंबा दिला आणि या फलंदाजाने पुन्हा दाखवलेला फॉर्म कौतुकास्पद आहे. त्यानंतर त्याने पुन्हा 64, 33, 75, 4, 88*, 38, 40, 45 आणि 101* धावांची खेळी खेळली आहे.

इतर बातम्या

मंधानाचं शतक, भारतीय क्रिकेटपटू म्हणाली, ओ हसिना जुल्फोंवाली…., मग स्मृतीच्या उत्तराने बोलती बंद!

IPL 2021: मराठमोळ्या ऋतुराजसमोर फिके पडले सर्व फलंदाज, युएईत खास कामगिरी

IPL 2021: कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, रोमहर्षक सामन्यात पंजाब 5 गडी राखून विजयी

(IPL 2021, RR vs CSK : Ruturaj Gaikwad Hits His Maiden IPL Century)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.