RR vs CSK Live Score, IPL 2021 : ऋतुराजची शतकी खेळी व्यर्थ, राजस्थानचा चेन्नईवर 7 गडी आणि 15 चेंडू राखून दणदणीत विजय

IPL 2021 स्पर्धेत आज अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये खेळवला जात आहे.

RR vs CSK Live Score, IPL 2021 : ऋतुराजची शतकी खेळी व्यर्थ, राजस्थानचा चेन्नईवर 7 गडी आणि 15 चेंडू राखून दणदणीत विजय
RR vs CSK

| Edited By: अक्षय चोरगे

Oct 02, 2021 | 11:45 PM

अबू धाबी : IPL 2021 स्पर्धेत आज अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 189 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी हा डोंगर अगदी सहजपणे सर केला. यशस्वी जयसवालची वादळी सुरुवात आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थाने 7 गडी आणि 15 चेंडू राखून चेन्नईने दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि एव्हिन लुईसने या सामन्यात वादळी सुरुवात केली. 5.2 षटकांमध्ये दोघांनी 77 धावांची सलामी दिली. लुईस 27 धावांवर बाद झाल्यानंतरही यशस्वी जयसवालने फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक फटकावलं. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅससनने 28 धावांची खेळी केली. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिल्याचा शिवम दुबेने चांगलाच फायदा उचलला, जयसवाल बाद झाल्यानंतर त्याने जोरदार फटकेबाजी केली. दुबेने 42 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. दुबेने 4 चौकार आणि 4 षटकार फटकावले.

चेन्नईचा शार्दुल ठाकूर व्यतिरिक्त उर्वरित सर्व गोलंदाज निष्प्रभ ठरले. त्याने 4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. के. एम. आसिफने 2.1 षटकात 18 धावा देत एक बळी घेतला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 02 Oct 2021 11:19 PM (IST)

  राजस्थानचा चेन्नईवर दणदणीत विजय

  राजस्थानने 17.3 षटकांमध्ये चेन्नईने दिलेलं 190 धावांचं आव्हान पार केलं आहे. त्याने चेन्नईवर 7 गडी आणि 15 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.

 • 02 Oct 2021 11:02 PM (IST)

  चेन्नईला तिसरं यश, संजू सॅमसन 28 धावांवर बाद

  राजस्थानने तिसरी विकेट गमावली आहे. शार्दुल ठाकूरने संजू सॅमसनला 28 धावांवर असताना ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद केलं. (राजस्थान 170/3)

 • 02 Oct 2021 10:57 PM (IST)

  शिवम दुबेचं अर्धशतक

  शिवम दुबेनं 31 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं आहे.

 • 02 Oct 2021 10:15 PM (IST)

  राजस्थानला मोठा झटका, यशस्वी जयस्वाल 50 धावांवर बाद

  राजस्थानने दुसरी विकेट गमावली आहे. केएम आसिफने यशस्वी जयसवालला 50 धावांवर असताना यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीकरवी झेलबाद केलं. (राजस्थान 83/2)

 • 02 Oct 2021 10:10 PM (IST)

  चेन्नईला पहिलं यश, एव्हिन लुईस 27 धावांवर बाद

  चेन्नईला पहिली विकेट मिळाली आहे. शार्दुल ठाकूरने एव्हिन लुईस 27 धावांवर असताना जोश हेजलवूडकरवी झेलबाद केलं. (राजस्थान 77/1)

 • 02 Oct 2021 09:29 PM (IST)

  अखेरच्या चेंडूवर षटकार, ऋतुराज गायकवाडचं शतक

  डावातील अखेरच्या चेंडूवर तब्बल 108 मीटर लांब षटकार ठोकत ऋतुराज गायकवाडने आयपीएल कारकिर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं.

 • 02 Oct 2021 09:10 PM (IST)

  चेन्नईला चौथा झटका, रायडू तंबूत परतला

  चेन्नईला चौथा झटका, अंबाती रायडू बाद, त्याने 4 चेंडूत फक्त 2 धावा केल्या

 • 02 Oct 2021 08:53 PM (IST)

  चेन्नईला तिसरा झटका, मोईन अली बाद

  चेन्नईला तिसरा झटका, मोईन अली बाद, मोईनच्या 17 चेंडूत 21 धावा

 • 02 Oct 2021 08:17 PM (IST)

  चेन्नईला दुसरा झटका, सुरेश रैना 3 धावांवर बाद

  राहुल तेवतियाने चेन्नईला दुसरा झटका दिला आहे. त्याने सुरेश रैनाला शिवम दुबेकरवी झेलबाद केलं. (57/2)

 • 02 Oct 2021 08:11 PM (IST)

  चेन्नईला पहिला धक्का, फाफ डुप्लेसी बाद

  चेन्नईने पहिली विकेट गमावली आहे. राहुल तेवतियाने फाफ डुप्लेसीला यष्टीरक्षक संजू सॅमसनकरवी यष्टिचिक केलं. त्याने 25 धावांचं योगदान दिलं. (चेन्नई 47/1)

 • 02 Oct 2021 07:34 PM (IST)

  चेन्नईची सलामीची जोडी मैदानात, पहिल्याच चेंडूवर ऋतुराजचा चौकार

  आकाश सिंगच्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडने चौकार वसूल करत त्याचं स्वागत केलं.

 • 02 Oct 2021 07:32 PM (IST)

  नाणेफेक जिंकून राजस्थानचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

  राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On - Oct 02,2021 7:30 PM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें