सुsssपर! न्यूझीलंडच्या खेळाडूचं तमिळ स्टाईल प्री-वेडिंग, धोनी-जडेजाकडून खासमखास आहेर

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) अवस्था वाईट आहे. या संघाने सहा पैकी पाच सामने गमावले असून गुणतालिकेतील खराब संघांमध्ये त्यांचा समावेश आहे. पण मैदानावरील निकाल काहीही असो चेन्नई सुपर किंग्जच्या कॅम्पमध्ये मात्र धमाल पाहायला मिळत आहे.

सुsssपर! न्यूझीलंडच्या खेळाडूचं तमिळ स्टाईल प्री-वेडिंग, धोनी-जडेजाकडून खासमखास आहेर
Devon Conway's pre-wedding event Image Credit source: CSK
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 12:17 PM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) अवस्था वाईट आहे. या संघाने सहा पैकी पाच सामने गमावले असून गुणतालिकेतील खराब संघांमध्ये त्यांचा समावेश आहे. पण मैदानावरील निकाल काहीही असो चेन्नई सुपर किंग्जच्या कॅम्पमध्ये मात्र धमाल पाहायला मिळत आहे. डेव्हॉन कॉनवेच्या (Devon Conway) प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ CSK च्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळत आहेत. 18 एप्रिल रोजी न्यूझीलंडच्या फलंदाजासाठी संघाच्या हॉटेलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचे सर्व खेळाडू उपस्थित होते. सर्वजण तामिळनाडूच्या पारंपरिक वेशभूषेत दिसले. तसेच डेव्हॉन कॉनवेसोबत सगळ्यांनी खूप मजा-मस्ती केली. तिथे भरपूर नाच-गाणी सुरु होती आणि बुफे स्टाईल जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

डेव्हॉन कॉनवे पहिल्यांदाच आयपीएलचा भाग बनला आहे. त्याला एक कोटी रुपयात चेन्नईने आपल्या संघात घेतले आहे. या मोसमातील पहिल्याच सामन्यात त्याने CSK च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले होते. सध्या तो बेंचवर बसून आहे. 18 एप्रिलला डेव्हॉन कॉनवेच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये संघातील खेळाडूंनी खूप मजा केली. CSK च्या खेळाडूंपासून ते सपोर्ट स्टाफपर्यंत सर्वांनी कुर्ता आणि वेश्टी (एक प्रकारचे धोतर/लुंगी) परिधान केले होते. CSK ने 90 च्या दशकातील स्टाईलमध्ये बनवलेल्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

डेव्हॉन कॉनवेचा प्री वेडिंग सेलिब्रेशनचा व्हिडीओ

कोण आहे कॉनवेची जोडीदार?

डेव्हॉन कॉनवेने 2020 मध्ये किम वॉटसनशी साखरपुडा केला. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे CSK तर्फे प्री वेडिंग इव्हेंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किम वॉटसन भारतात आहे. व्हिडिओ कॉलद्वारे ती या कार्यक्रमात सामील झाली होती. CSK ने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये किम पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. तर कॉनवेने पांढरा शर्ट आणि वेश्टी परीधान केली होती. या कार्यक्रमासाठी त्याने सीएसकेचे आभार मानले. तसेच तो किम वॉटसनबद्दल बोलत होता.

यानंतर, CSK च्या सर्व खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफने डेव्हॉन कॉनवेला लिफाफे दिले आणि सर्वजण नाचले, गायले. सीएसकेचे सर्व युवा खेळाडू कॉनवेसोबत एकत्र नाचले. त्यांच्यासाठी केकही कापण्यात आला.

इतर बातम्या

IPL 2022, LSG vs RCB , Purple Cap : बँगलोरचा लखनौवर मोठा विजय, पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

IPL 2022, LSG vs RCB, Orange Cap : बँगलोरचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

LSG vs RCB IPL 2022: रवीना टंडनच्या अदांनी केलं घायाळ, KGF 2 ची टीम डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.