AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन वेळा IPL जिंकलेला खेळाडू दिल्लीच्या संघात, धोनीचा आवडता ऑलराऊंडर पंतला धडे देणार

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) ही स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्या संघासोबत एक असं नाव जोडलं आहे ज्या खेळाडूने दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. तसेच तो माजी दिग्गज भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आवडत्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे.

दोन वेळा IPL जिंकलेला खेळाडू दिल्लीच्या संघात, धोनीचा आवडता ऑलराऊंडर पंतला धडे देणार
IPL 2022: Delhi Capitals Image Credit source: DC Instagram
| Updated on: Mar 15, 2022 | 4:25 PM
Share

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) ही स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्या संघासोबत एक असं नाव जोडलं आहे ज्या खेळाडूने दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. तसेच तो माजी दिग्गज भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आवडत्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. शेन वॉटसन (Shane Watson) असं या खेळाडूचं नाव आहे. दिल्लीने ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमधला मोठा मॅच विनर शेन वॉटसन याची संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे आधीच सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अजित आगरकर आहे पण या फ्रँचायझीने शेन वॉटसनलाही आपल्या प्रशिक्षक संघात स्थान दिले आहे. शेन वॉटसन हे आयपीएलमधील मोठे नाव आहे, त्याने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जसह आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. शेन वॉटसन आरसीबीकडूनदेखील आयपीएल खेळला आहे आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा शेवट केला. वॉटसन 2020 मध्ये अखेरचा आयपीएल सामना खेळला आणि त्यानंतर त्याने क्रिकेटला अलविदा केला.

वॉटसनने आयपीएलमध्ये 145 सामन्यांमध्ये 3874 धावा केल्या आहेत. तसेच 92 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. वॉटसनचे हे आकडे त्याचा शानदार अनुभव दर्शवतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दांडग्या अनुभवामुळे वॉटसनचा दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये समावेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आहे. अजित आगरकर आणि शेन वॉटसन हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स आणि फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण अमरे आहेत.

वॉटसन म्हणाला, दिल्लीने चॅम्पियन बनण्याची वेळ आलीय

दिल्ली कॅपिटल्सने कधीही आयपीएलचे विजेतेपद पटकावलेलं नाही, ते 2020 मध्ये अंतिम फेरीत पराभूत झाले पण शेन वॉटसनला आशा आहे की, आता दिल्लीची प्रतीक्षा संपणार आहे. शेन वॉटसनने दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “खेळाडू म्हणून माझ्या या स्पर्धेशी खूप छान आठवणी जोडल्या गेल्या आहेत आणि आता मला प्रशिक्षकाची जबाबदारी मिळाली आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ही संधी मिळाल्याने आनंद अजून वाढला आहे. पॉन्टिंग एक उत्तम लीडर आणि कर्णधार आहे. तो जगातील सर्वोत्तम क्रिकेट प्रशिक्षकांपैकी एक आहे. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळेल. मी आगामी स्पर्धेसाठी खूप उत्सूक आहे.”

इतर बातम्या

श्रीलंकेवरील मोठ्या विजयामुळे WTC Points Table मध्ये टीम इंडियाला मोठा फायदा

IND vs SL: ‘श्रेयसला माहितीय तो अजिंक्यच्या….’, रोहित शर्मा अय्यरबद्दल बोलला खास गोष्ट

दोन दिवसात ठरणार, हार्दिक पंड्या IPL 2022 मध्ये खेळणार की, नाही, परीक्षा द्यावीच लागेल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.