AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादवच्या मुंबई इंडियन्सकडे ‘हा’ पर्याय

आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एक वाईट बातमी आली आहे. स्पर्धेतील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवला जाणार आहे. पण, या सामन्यात मुंबईचा महत्त्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) खेळणार की नाही याबाबत सस्पेंस कायम आहे.

IPL 2022: दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादवच्या मुंबई इंडियन्सकडे 'हा' पर्याय
Suryakumar Yadav Image Credit source: AFP
| Updated on: Mar 15, 2022 | 3:18 PM
Share

मुंबई : आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एक वाईट बातमी आली आहे. स्पर्धेतील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवला जाणार आहे. पण, या सामन्यात मुंबईचा महत्त्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) खेळणार की नाही याबाबत सस्पेंस कायम आहे. तो मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकत नसल्याचे वृत्त आहे. सूर्यकुमार मुंबईच्या मधल्या फळीतील एक बलस्थान आहे. अशा परिस्थितीत त्याचं न खेळणं संघासाठी अडचणी निर्माण करू शकतं. तेही जेव्हा स्पर्धेचा पहिला सामना असेल आणि प्रत्येक संघ विजयाने सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला असेल.

सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात न खेळण्याचे कारण त्याची दुखापत असल्याचे मानले जात आहे, त्यामुळे त्याला बरे होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. खरं तर, भारतीय फलंदाज वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला होता, आता त्याचे आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात खेळणे कठीण आहे.

अंगठ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकणार

पीटीआयच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादवला अंगठ्याच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी वेळ लागणार आहे, त्यामुळे तो आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. IPL 2022 चा पहिला सामना 27 मार्च रोजी होणार आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असेल.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “सूर्यकुमार यादव सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरूमध्ये रिहॅब करत आहेत. तो दुखापतीतून सावरण्याच्या मार्गावर आहे. पण तो आयपीएल 2022 चा पहिला सामना खेळेल की नाही हे आत्ताच सांगणे कठीण आहे. बोर्डाचे वैद्यकीय कर्मचारी त्याला स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यापासून दूर राहण्यास सांगण्याची शक्यता आहे.

तिलक वर्माला संधी

सूर्यकुमार यादव हा मुंबईच्या मधल्या फळीतला सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे. गेल्या 3-4 वर्षात मुंबईने आयपीएलमध्ये जे यश मिळवलं आहे, त्यात सूर्याचा महत्त्वाचा वाटा आहे. अशा परिस्थितीत सूर्याचं न खेळणं मुंबईसाठी डोकेदुखी वाढवणारं आहे. दरम्यान, मुंबईकडे सुर्याच्या जागी तिलक वर्मा हा नवीन पर्याय उपलब्ध आहे. तो मधल्या फळीत सूर्याची जागा घेऊ शकतो.

सूर्यकुमार 2 एप्रिलला दुसरा सामना खेळणार

मुंबई इंडियन्सला आयपीएल 2022 मध्ये त्यांचा दुसरा सामना 2 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचा आहे. सूर्यकुमार दुसऱ्या सामन्यात खेळेल अशी अपेक्षा आहे. सूत्रांनी सांगितले की, “तोपर्यंत सूर्यकुमार पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) होईल आणि तो खेळण्यास तयार होईल.” सूर्यकुमार यादव हा त्या खेळाडूंपैकी एक आहे ज्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतही तो भारताच्या विजयाचा हिरो होता. त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.