IPL 2022 Eliminator: LSG vs RCB सामन्यात पाऊस व्यत्यय आणेल? जाणून घ्या आज कसं असेल हवामान

IPL 2022 Eliminator: पहिल्या क्वालिफायरप्रमाणे हा सामना सुद्धा कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. कोलकातामध्ये मागच्या काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. अशावेळी तिथे सामने आयोजित करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

IPL 2022 Eliminator: LSG vs RCB सामन्यात पाऊस व्यत्यय आणेल? जाणून घ्या आज कसं असेल हवामान
eden garden Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 5:29 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये लीग स्टेज संपली असून आता प्लेऑफचे (playoff) सामने सुरु झाले आहेत. पहिल्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier Matches) विजय मिळून गुजरात टायटन्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ कुठला असेल? याचा निर्णय शुक्रवारी होईल. लीगच्या एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. पहिल्या क्वालिफायरप्रमाणे हा सामना सुद्धा कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. कोलकातामध्ये मागच्या काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. अशावेळी तिथे सामने आयोजित करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन बीसीसीआयने प्लेऑफसाठी काही नवीन नियम बनवले. त्याची माहिती सुद्धा दिली आहे. कालच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणेल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. पण सुदैवाने असं घडलं नाही.

पावसाबद्दल हवामान विभागाचा अंदाज काय?

आजचा सामना RCB आणि LSG दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. जो संघ हरेल, त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. हवामान विभागाने आजच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे. वातावरण स्वच्छ असेल, पाऊस व्यत्यय आणणार नाही, असा अंदाज आहे. तापमान 27 डिग्री ते 36 पर्यंत असेल.

बीसीसीआयचे नवीन नियम

पावसाने व्यत्यय आणला आणि नियमित वेळेत सामना सुरु होऊ शकला नाही, तर विजेता सुपरओव्हरमधून ठरवला जाईल. एका षटकाचा खेळही शक्य झाला नाही, तर पॉइंट्स टेबलमध्ये कुठला संघ टॉपवर आहे, त्या आधारावर निकाल लावला जाईल. क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 साठी कुठलाही रिझर्व्ह दिवस ठेवलेला नाही. फायनलसाठी मात्र पावसाने बाधा आणली, तर एक रिझर्व्ह दिवस आहे. 30 मे हा फायनलसाठी राखीव दिवस आहे. रात्री आठवाजता सामना सुरु होईल.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.