LSG vs SRH KL Rahul: भुवनेश्वर कुमारच्या विकेटचं सेलिब्रेशन नको, राहुलने टीम मेंबर्सना असं का सांगितलं?

LSG vs SRH KL Rahul: काल लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (LSG vs SRH) सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना लखनौने 12 धावांनी जिंकला.

LSG vs SRH KL Rahul: भुवनेश्वर कुमारच्या विकेटचं सेलिब्रेशन नको, राहुलने टीम मेंबर्सना असं का सांगितलं?
IPL 2022: भुवनेश्वर कुमार-केएल राहुल
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 3:54 PM

मुंबई: काल लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (LSG vs SRH) सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना लखनौने 12 धावांनी जिंकला. शेवटच्या षटकात सनरायजर्स हैदराबादला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. जेसन होल्डर (Jason Holder) ओव्हर टाकत होता. T-20 क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 16 धावा सहज होऊ शकतात. पण जेसनने अप्रतिम गोलंदाजी करुन षटकात फक्त चारच धावा दिल्या. त्याने तीन विकेटही काढल्या. जेसनच्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारची (Bhuvneshwar Kumar) विकेट मिळाली. त्यानंतर दोन चेंडूत विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. सनरायजर्ससाठी विजय जवळपास अशक्यप्राय होता. भुवनेश्वर कुमारची विकेट गेल्यानंतर लखनौचा कॅप्टन के.एल.राहुलने टीम मेंबर्सना सेलिब्रेशन न करण्याची सूचना केली होती. केएल राहुलने स्वत: या सामन्यात दमदार प्रदर्शन केलं.

लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात खराब

राहुलने कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. त्याने 50 चेंडूत 68 धावा फटकावल्या. लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली होती. 27 धावात तीन विकेट गेल्या होत्या. दीपक हुड्डा आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करुन डाव सावरला. दीपक हुड्डा 51 रन्सवर आऊट झाला. राहुलने 68 धावा केल्या.

राहुलला षटकं लवकर संपवायची होती

लखनौने कालचा सामना जिंकला. पण केएल राहुलने आपल्या टीममधील मेंबर्सना भुवनेश्वर कुमारची विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन न करण्याची सूचना केली होती. तुम्हाला प्रश्न पडला असेल, राहुलने असं का सांगितलं, त्यामागे काय कारण आहे? खरंतर राहुलला षटकं लवकर संपवायची होती. लखनऊच्या कॅप्टन राहुलला कल्पना होती. 11 वाजून गेल्यानंतरही सामना सुरु होता. त्यामुळे तो सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न करत होता.

दंडामध्ये किती लाख भरावे लागतात?

यंदाच्या आयपीएलमध्ये वेळेत षटक पूर्ण न केल्याबद्दल कॅप्टनला दंड आकारण्यात आला आहे. राहुलला आपलं नाव त्या यादीत नको होतं. म्हणून त्याने सेलिब्रेशन न करता सामना लवकर संपवण्याला प्राधान्य दिलं. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला षटकांची गती धीमी राखल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळेच राहुलने सेलिब्रेशन न करण्याची सूचना केली होती. कारण विकेट गेल्यानंतर प्रत्येक टीम सेलिब्रेशन करते, त्यात काही मिनिट जातात. या काही मिनिटांमुळे लाखो रुपये भरावे लागू शकतात. याची केएल राहुलला कल्पना होती. म्हणून त्याने सामना लवकरात लवकर संपवला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.