AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: बर्थ डे च्या दिवशी रोहितला 2 धावांनी दिल्या दोन मोठ्या वेदना, पत्नीचा चेहरा पडला, निराश नाही लपवता आली, VIDEO

IPL 2022 Rohit sharma: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रोहितने पाच चेंडूंमध्ये फक्त दोन धावा केल्या. काहीसा असाच स्कोर त्याने 2014 साली त्याच्या बर्थ डे च्या दिवशी केला होता.

IPL 2022: बर्थ डे च्या दिवशी रोहितला 2 धावांनी दिल्या दोन मोठ्या वेदना, पत्नीचा चेहरा पडला, निराश नाही लपवता आली, VIDEO
Image Credit source: IPL
| Updated on: Apr 30, 2022 | 11:36 PM
Share

मुंबई: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्माचा (Rohit sharma) आज वाढदिवस आहे. त्यामुळे रोहित आज स्पेशल इनिंग खेळेल असं सर्वांना वाटलं होतं. पण रोहित शर्मा मैदानात फलंदाजीसाठी गेला, तेव्हा तो आठ वर्ष जुना इतिहास बदलू शकला नाही. रोहित शर्मा आज फक्त 2 रन्स काढून डगआउटमध्ये परतला. रोहित लवकर बाद झाल्यामुळे त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) खूप निराश झाली. तिच्या चेहऱ्यावरचे निराशेचे भाव कॅमेऱ्याने स्पष्टपणे टिपले. फक्त रोहित 2 धावांवर आऊट होण्यापुरतचं हे दु:ख मर्यादीत नाहीय. या दोन धावांनी दोन मोठ्या वेदना दिल्या. रोहित शर्माने ना इतिहास बदलला किंवा ते रेकॉर्डही बदलले नाहीत, जे एक प्रकारचा डाग आहेत.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रोहितने पाच चेंडूंमध्ये फक्त दोन धावा केल्या. काहीसा असाच स्कोर त्याने 2014 साली त्याच्या बर्थ डे च्या दिवशी केला होता. त्यावेळी त्याने पाच चेंडूत फक्त 1 रन्स केला होता. म्हणजे तो इतिहास आजही रोहित शर्मा बदलू शकला नाही.

इथे क्लिक करुन पहा रोहितचं आऊट होणं आणि त्याच्या पत्नीला झालेलं दु:ख 

रोहितची दोन दु:ख

रोहित शर्मा या सीजनमध्ये 9 व्या सामन्यात सहाव्यांदा पावरप्लेच्या षटकांमध्ये आऊट झालाय. दुसरं दु:ख हे आहे की, 17 इनिंग्स झाल्या. पण त्याला अजून एक अर्धशतक झळकावता आलेलं नाही. आज रोहितने वयाच्या 35 व्या वर्षात पदार्पण केलं. अश्विनच्या गोलंदाजीवर रोहित बाद झाला. रोहित शर्माच्या रुपाने मुंबई इंडियन्सला पहिला झटका बसला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशनने थोडी फटकेबाजी केली. पण 26 धावांवर तो आऊट झाला. सूर्यकुमार यादवने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमार पाठोपाठ तिलक वर्माही बाद झाला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....