AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant | ऋषभ पंत याच्या पाठोपाठ उर्वशी रौतेलाही स्टेडियममध्ये?

ऋषभ पंत याने अपघातानंतर पहिल्यांदाच एखाद्या क्रिकेट सामन्याला हजेरी लावली. पंतने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरा जायंट्स या सामन्याला उपस्थिती लावून चाहत्यांचा उत्साह वाढवला. तसेच पंतच्या उपस्थितीनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांना उर्वशी रौतेला हीची आठवण आल्याशिवाय राहिली नाही.

Rishabh Pant | ऋषभ पंत याच्या पाठोपाठ उर्वशी रौतेलाही स्टेडियममध्ये?
| Updated on: Apr 04, 2023 | 11:22 PM
Share

नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमातील 7 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. हा सामना दिल्लीचं होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. दिल्ली कॅपिट्ल्सचा कर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याला रस्ते अपघातात दुखापत झाली. त्यामुळे पंत या मोसमात खेळू शकत नाहीये. मात्र आपल्या होम ग्राउंडवर ऋषभ पंतने आपल्या टीमचा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावली. पंतच्या या एन्ट्रीमुळे चाहत्यांना एकच सुखद धक्का बसला.

ऋषभ या मोसमात अपघातातील दुखापतीमुळे खेळण्यात असमर्थ आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा ही डेव्हिड वॉर्नर याला देण्यात आली आहे. तर तर पंतच्या जागी टीममध्ये अभिषेक पोरेल याचा समावेश केला गेला आहे. पोरेल याला 20 लाख रुपये मोजून आपल्या टीममध्ये घेतलं आहे.

अभिषेक याने 16 फर्स्ट क्लास आणि 3 लिस्ट ए सामन्यांमध्ये बंगळुरुचं प्रतिनिधित्व केलं आहे. पंत याच्या अपघातामुळे अभिषेक याला ही संधी मिळाली आहे. आता संपूर्ण मोसमात अभिषेक विकेटकीपिंग करताना दिसणार आहे. यामुळे अभिषेक कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

भन्नाट मिम्स व्हायरल

ऋषभ पंतला मैदानात पाहिल्यानंतर उर्वशी रौतेला

उर्वशीची स्टेडियमच्या दिशेने धावाधाव

दरम्यान नेटकऱ्यांनी ऋषभ पंतच्या स्टेडियममधील एन्ट्रीनंतर मॉडेल उर्वशी रौतेला हीच्यावर अनेक मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याआधी आणि आतापर्यंत उर्वशी आणि पंत यांच्यात काही तरी शिजत असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली. इतकंच काय, तर पंतवर मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना उर्वशीने एक फोटोही शेअर केला होता. यातून आपल्याला पंतबाबत किती आपुलकी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न उर्वशीने केला होता.

उर्वशी पंतला फॉलो करत असते. उर्वशी पंतला डिवचण्याचा म्हणा किंवा इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते. आता पंत स्टेडियममध्ये पोहचलाय म्हटल्यांवर उर्वशीही कशी मागे राहिल? नेटकऱ्यांनाही पंतला उर्वशीशिवाय पाहावलं नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी उर्वशीला स्टेडियमपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी घेतली. एक विनोदी मिम सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोत पंत स्टेडियममध्ये असल्याचं समजताच उर्वशी क्रिकेट ग्राउंडच्या दिशेने वेगात पळून जाताना दाखवलं आहे. पण या फोटोत कोबंडीच्या रुपात उर्वशीला दाखवण्यात आलं आहे. उर्वशी अरुण जेटली स्टेडियमला पोहचतेय असा मजकूर या मिमवर लिहिण्यात आला आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन 

डेविड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, एसएन खान, आरआर रोस्सोव, अमन हकिम खान, एआर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नार्त्झे आणि मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन

हार्दिक पंड्या (कर्णधार) , वृद्धिमान साहा, शुबमन गिल, साई सुदर्शन, डेविड मिलार, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल आणि अलझारी जोसेफ.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.