IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी सामना रद्द? गुणतालिकेत होणार मोठा उलटफेर

DC vs RCB IPL 2023 : आयपीएल 2023 मधील 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आहे. मात्र या सामन्याबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते..

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी सामना रद्द? गुणतालिकेत होणार मोठा उलटफेर
IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला लागली नजर, कोणाचं नुकसान कोणाचा फायदा जाणून घ्याImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 12:38 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. अजूनही कोणत्याच संघाचं काहीच ठरलेलं नाही. एक हार जीत अख्ख्या गुणतालिकेचं गणित बदलू शकतं अशी स्थिती आहे. त्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्याचा थेट परिणाम गुणतालिकेवर दिसून आला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाल्याने एक तर दोघांचं नुकसान किंवा दोघांचा थेट फायदा होऊ शकतो. आता अशीच काहीसी स्थिती दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात आहे.

दिल्ली विरुद्ध बंगळुरु हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. पण हवामान खात्याच्या अंदाजामुळे सर्व गणित फिस्कटेल असंच चित्र आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वारा 16 किमी वेगाने वाहात आहे. तर तापमान 26 ते 41 डिग्री सेल्सियसपर्यंत राहील.

दोन्ही संघांना प्लेऑफसाठी हा विजय महत्त्वाचा आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास बंगळुरु आणि दिल्लीचं नुकसान होणार. खासकरून दिल्लीच्या आशा पूर्णपणे संपुष्टात येतील. गुणतालिकेत बंगळुरुचा संघ पाचव्या स्थानी आहे. एका गुणामुळे 11 गुण होतील.

मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्याचा काही निकाल लागला तर बंगळुरुचं नुकसान होईल. कारण मुंबई जिंकली तर 12 गुणांसह दुसऱ्या स्थानी जाईल. चेन्नई जिंकली तर 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी असेल. त्यामुळे बंगळुरुला मोठा फटका बसू शकतो.

दुसरीकडे बंगळुरुचा नेट रनरेट तितका चांगला नाही. चेन्नई जिंकली तर चौथं स्थान मिळेल. पण मुंबई जिंकली तर मात्र सहा स्थानावर घसरण होईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, केदार जाधव, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.