AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! ऐन मोक्याची क्षणी दिग्गज खेळाडूने घेतला साथ सोडण्याचा निर्णय

आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. आतापर्यंतच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ अव्वल स्थानी आहे. मात्र असं असताना दिग्गज खेळाडू आयपीएल स्पर्धा मध्यातच सोडणार आहे.

IPL 2023 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! ऐन मोक्याची क्षणी दिग्गज खेळाडूने घेतला साथ सोडण्याचा निर्णय
IPL 2023 : प्लेऑफपूर्वीच गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, दिग्गज खेळाडूने घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णयImage Credit source: Twitter
| Updated on: May 06, 2023 | 3:49 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सने 10 पैकी 7 सामने जिंकत अव्वल स्थान पटकावलं आहे. 14 गुण आणि 0.752 च्या रनरेटसह हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ पहिल्या स्थानी आहे. आयपीएल 2022 स्पर्धेत गुजरातनं जेतेपद पटकावलं होतं. यंदाही गुजरातची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक संघ आहे. असं असताना साखळी फेरीतील उर्वरित सामने आणि प्लेऑफपूर्वीत वेगवान गोलंदाजाने संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जोशुआ लिटलने देशासाठी आयपीएल स्पर्धा काही दिवसांसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी जोशुआ लिटलला आयर्लंड संघात स्थान मिळालं आहे. ही वनडे मालिक 9 मे पासून सुरु होणार आहे. 14 मे रोजी बांगलादेश विरुद्धची मालिका संपणार आहे. त्यानंतर तो पुन्हा गुजरात टायटन्स ताफ्यात रुजू होणार आहे. गुजरातचा पुढता सामना 7 मे रोजी लखनऊसोबत आहे. तर 12 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध लढत असणार आहे.

“आम्ही त्याला शुभेच्छा देतो की आपल्या देशासाठी खेळण्यासाठी जात आहे.त्याची आयपीएलमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. वनडे मालिका संपल्यानंतर तो पु्न्हा येईल.”, असं गुजरात टायटन्सचे डायेरक्टर विक्रम सोलंकी यांनी सांगितलं.

जोशुआ लिटलची आतापर्यंत दहा सामन्यातील कामगिरी

  • चेन्नई विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 41 धावा देत 1 गडी बाद केला.
  • दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 27 धावा दिल्या. एकही गडी बाद केला नाही.
  • कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 45 धावा देत 1 गडी बाद केला.
  • पंजाब विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 31 धावा देत 1 गडी बाद केला.
  • राजस्थन आणि लखनऊ विरुद्धच्या सामन्यात त्याला आराम देण्यात आला होता.
  • मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 2 षटकात 18 धावा दिल्या. एकही गडी टिपता आला नाही.
  • कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 25 धावा देत 2 गडी बाद केले.
  • दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 3 षटकात 27 धावा दिल्या. एकही गडी बाद करता आला नाही.
  • राजस्थान विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 24 धावा देत एक गडी बाद केला.

गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.