AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक्शन रिप्ले | पुन्हा नितीश राणा आणि रिंकु सिंह याचा तडाखा, शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला सामना, अखेर हैदराबाद विजयी

KKR vs SRH IPL 2023 : आयपीएल 2023 स्पर्धेत हैदराबादनं कोलकात्याला पराभूत केल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. एका सामन्यांच्या विजयाने किंवा पराभवाने आता गणितं बदलणार असं चित्र आहे.

एक्शन रिप्ले | पुन्हा नितीश राणा आणि रिंकु सिंह याचा तडाखा, शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला सामना, अखेर हैदराबाद विजयी
KKR vs SRH 2023 : हॅरी ब्रूकचं शतक रंगलं, हैदराबादचा केकेआरवर 23 धावांनी विजयImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 14, 2023 | 11:50 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत सनराईजर्स हैदराबादनं कोलकाता नाईट नाईडर्स विरुद्धचा सामना 23 धावांनी जिंकला. या विजयासह हैदराबादनं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. चार गुणांसह हैदराबादचा संघ सातव्या स्थानावर आहे. हैदराबादनं विजयासाठी 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण कोलकाता संघाला 20 षटकात 7 गडी गमवून 205 धावा करता आल्या. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगल्याने क्रीडा रसिकांची धाकधूक वाढली होती. पण नितीश राणा आणि रिंकु सिंह यांची अर्धशतकी खेळी वाया गेली असंच म्हणावं लागेल. शेवटच्या षटकात तशी कमाल पुन्हा करता आली नाही.  त्यामुळे सलग तीन विजय मिळवण्याचं कोलकात्याचं स्वप्न भंगलं. स्पर्धेतील संघांचे गुण पाहता चांगली चुरस निर्माण होणार आहे.

कोलकात्याचा डाव

हैदराबादनं विजयासाठी दिलेल्या 229 धावांचा पाठलाग करण्यासाठी रेहमनुल्ला गुरबाज आणि नारायण जगदीसन ही जोडी मैदानात उतरली. पण तिसऱ्या चेंडूवर खातंही न खोलता गुरबाज भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेला वेंकटेश अय्यरही काही खास करू शकला नाही. मार्कोच्या गोलंदाजीवर अवघ्या 10 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला सुनिल नरीनही शून्यावर बाद झाला. त्यामुळे संघावर दबाव वाढला

कर्णधार नितीश राणा मैदानात आला आणि जगदीसनसोबत चांगली भागीदारी केली. आक्रमक खेळी करत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. ही जोडी फोडण्यात मयंक मार्केंडयला यश आलं. जगदीसन 36 धावांवर असताना त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

आंद्रे रसेल संघावरील दबाव दूर करण्यासाठी उत्तुंग फटका मारला. पण चेंडू खूप वर चढल्यानं मार्को जानसेननं कसलीही चूक न करता त्याचा झेल घेतला. त्यानंतर नितीश राणा आणि रिंकु सिंह जोडीने कमाल केली. सहाव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दरम्यान नितीशला झेल सोडल्याने जीवदान मिळालं. आक्रमक खेळी करताना टी नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 41 चेंडूत 75 धावा केल्या. त्यानंतर शार्दुल ठाकून 7 चेंडूत 12 धावा करून बाद झाला.

हैदराबादचा डाव

हैदराबादकडून मयंक अग्रवाल आणि हॅरी ब्रूक ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या गड्यासाठी चांगली खेळी केली. तर हॅरी ब्रूकने आक्रमक खेळी केली. पण 9 धावांवर असताना मयंक अग्रवाल बाद झाला. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर वरुण चक्रवर्थीने त्याचा झेल घेतला.  त्यानंतर राहुल त्रिपाठीही काही खास करू शकला नाही. दोन चौकार मारल्यानंतर आंद्रे रसेलनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ब्रूक आणि मार्करमनं हैदराबादचा डाव सावरला.  मार्करमने आक्रमक फटकेबाजी करत 50 धावा ठोकल्या. पण उत्तुंग फटका मारताना वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

अभिषेक शर्माने मैदानात येत आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याने  17 चेंडूत 32 धावांची खेळी केली. मात्र आंद्रे रसेलच्या गोलंदाजी झेलबाद झाला. त्यानंतर ब्रूक्सन मोर्चा सांभाळला आणि शतकी खेळी केली. त्याने 55 चेंडूत 100 धावा केल्या.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.