AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Playoff : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना मुंबईने गमावला तर प्लेऑफचं गणित असं असेल? जाणून घ्या

आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्सने पहिली एन्ट्री मारली आहे. मात्र अजूनही तीन संघांसाठी सात फ्रेंचाईसीमध्ये जबरदस्त चुरस आहे. त्यामुळे टॉपमधील संघांच्या सामन्यावर सर्वकाही अवलंबून आहे. मुंबईने लखनऊ विरुद्धचा सामना गमावला तर काय? जाणून घ्या

IPL 2023 Playoff : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना मुंबईने गमावला तर प्लेऑफचं गणित असं असेल? जाणून घ्या
IPL 2023 Playoff : लखनऊ विरुद्धचा सामना गमावला तर मुंबई कशी पोहोचणार प्लेऑफमध्ये? समजून घ्या
| Updated on: May 16, 2023 | 2:22 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 63 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. प्लेऑफच्या दृष्टीकोनातून दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्स 14 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स 13 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. लखनऊच्या होमग्राउंडवर हा सामना होत आहे. त्यात आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स दोन वेळा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यात लखनऊने बाजी मारली आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. हा सामना मुंबई इंडियन्सने गमावला तर प्लेऑफचं गणित कसं असेल समजून घ्या.

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही संघांचा प्रत्येकी एक सामना उरणार आहे. त्यामुळे दोन गुणांची कमाई प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या सामन्यावर बंगळुरु, राजस्थान, कोलकाता आणि पंजाबला एक संधी मिळणार आहे. मुंबई इंडियन्सचा लखनऊनंतर शेवटचा सामना सनराईजर्स हैदराबादसोबत आहे.

कसं असेल मुंबईचं प्लेऑफचं गणित

  • मुंबई इंडियन्सनने लखनऊ विरुद्धचा सामना गमावल तर हैदराबाद विरुद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. त्याचबरोबर इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल.
  • कोलकात्याने लखनऊला पराभूत करावं, तसेच आरसीबीला हैदराबाद आणि गुजरातने पराभूत करणं गरजेचं आहे.त्याचबरोबर पंजाब विरुद्धचा सामना राजस्थाने जिंकावा.
  • चेन्नईला दिल्लीने पराभूत केल्यास मुंबईसाठी प्लेऑफचं गणित सोपं होईल आणि आणखी एक संधी मिळेल.
  • हैदराबाद आणि दिल्लीचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे हे दोन संघ टॉपमधील संघांना पराभूत करतील तितकं मुंबईला बरं असेल.

तर मुंबई दुसऱ्या स्थानावर जाईल

प्लेऑफमध्ये पहिलं आणि दुसरं स्थान खूपच महत्त्वाचं असतं. कारण एक सामना गमावला तरी दुसरी संधी मिळते. त्यामुळे प्लेऑफच्या दृष्टीने हे स्थान खूपच महत्त्वाचं आहे. मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत केलं तर दुसऱ्या स्थानी पोहोचणार आहे. कारण मुंबईचे 16 गुण आहेत. चेन्नईचे 15 गुण आहेत. चेन्नईने दिल्ली विरुद्धचा शेवटचा सामना गमावला तर मात्र मुंबईच दुसऱ्या स्थानी राहील. त्यामुळे प्लेऑफमध्ये दोन संधी मिळतील.

मुंबईचा संपूर्ण संघ

मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.