AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह IPL 2023 स्पर्धेतूनही बाहेर?

यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह याची आयपीएल 2023 च्या स्पर्धेतून कमबॅक करेल, असं म्हटलं जात होतं. मात्र आता नवीन अपडेट समोर आली आहे.

Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह IPL 2023 स्पर्धेतूनही बाहेर?
| Updated on: Feb 21, 2023 | 8:56 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा स्टार वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीचा सामना करतोय. या दुखापतीमुळे बुमराहला गेल्या अनेक मालिकांना मुकावं लागलं आहे. बुमराह याची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठीही निवड करण्यात आली नाही. मात्र या दरम्यान बुमराह आयपीएल 2023 च्या स्पर्धेतून कमबॅक करेल, असं म्हटलं जात होतं. मात्र या दरम्यान बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

दुखापतीबाबत अपडेट

आयपीएलच्या 16 व्या मोसमाबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात ही 31 मार्चपासून होणार आहे. तर 28 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार, बुमराह याला एनसीएतून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे बुमराह आयपीएल 2023 मध्ये खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही.

बुमराहला टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या आधी पाठदुखीच्या त्रास झाला होता. बुमराह तेव्हापासून दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएत मेहनत घेतोय. या दरम्यानच्या काळात बुमराहला आणखी एक दुखापत झाली. त्यामुळे बुमराहचं कमबॅक रखडत गेलं. बुमराह अजून राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरु इथे दुखापतीवर मेहनत घेतोय.

रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

बुमराह याने एनसीएत गेल्या 10 दिवसांपासून सराव सामन्यांमध्ये सहभागी झालेला नाही. बीसीसीआय सातत्याने बुमहारच्या दुखापतीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

बीसीसीआय बुमराहबाबत फार अलर्ट आहे. कारण अगदी काही महिन्यांवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धा येऊन ठेपली आहे. तर याआधी आयपीएलचा 16 वा मोसमही आहे.

बुमराह टीम इंडियाच्या बॉलिंग डिपार्टमेंटचा हेड आहे. त्यामुळे या 2 महत्वाच्या स्पर्धेआधी बीसीसीआय बुमराहबाबत कोणतीही जोखीम घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे बुमराह लवकरात लवकर बरा होऊन आयपीएलच्या 16 व्या मोसमाठी फिट व्हावा अशीच इच्छा मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटकडून केली जात आहे.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.