AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 | Arjun Tendulkar याला आता Mumbai Indians प्लेइंग इलेव्हनमध्ये नो एन्ट्री!

अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्समध्ये 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मुंबई इंडियन्समध्ये पदार्पणाची संधी मिळाली. मात्र काही सामन्यानंतर त्याला पुन्हा वगळण्यात आलं.

IPL 2023 | Arjun Tendulkar याला आता Mumbai Indians प्लेइंग इलेव्हनमध्ये नो एन्ट्री!
Arjun TendulkarImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 13, 2023 | 1:31 AM
Share

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातून सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अर्जुन याला काही सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा याने प्लेइंग इलेव्हनमध्ये दिली. मात्र त्यानंतर सातत्याने अर्जुन तेंडुंलकर याला बाहेर बसावं लागलं. त्यामुळे अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये का खेळवण्यात येत नाही, रोहितचा अर्जुन तेंडुलकर याच्यावर विश्वास नाही का, असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहे.

अर्जुन तेंडुलकर याने केकेआर विरुद्ध 16 एप्रिल रोजी आयपीएल 16 व्या मोसमातील 22 व्या सामन्यातून आयपीएल पदार्पण केलं. अर्जुनने त्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप सोडली. अर्जुनने त्यानंतर मुंबईसाठी 4 सामने खेळला. अर्जुनने यात 3 विकेट्स घेतल्या. मात्र यानंतर फक्त एका ओव्हरने अर्जुनचा गेम ओव्हर केला.

अर्जुनने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात एका ओव्हरमध्ये 31 धावा दिल्या. सॅम करन आणि हरप्रीत भाटीया दोघांनी 31 धावा ठोकल्या. यामुळे अर्जुनवर टीका झाली. त्यानंतर अर्जुनने गुजरात टायटन्स विरुद्ध कमबॅक करत 2 ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली. मात्र त्यानंतर रोहित शर्मा याने अर्जुनला खेळवलं नाही.

अर्जुन प्लेइंग इलेव्हनमधून ‘आऊट’ कशामुळे?

अर्जुन गुजरात टायटन्स विरुद्धच्या लढतीत अखेरचा खेळला होता. अर्जुनने पावर प्लेमध्ये 2 ओव्हर टाकल्या. यात अर्जुनने 1 विकेटही घेतली. पंजाब विरुद्धही त्याने पावर प्लेमध्ये 1 विकेट मिळवला. मात्र त्यानंतर रोहितने अर्जुनला बॉलिंग दिली नाही. इतकंच नाही, तर सलग 4 सामन्यांमध्ये अर्जूनला संधी मिळालीच नाही.

अर्जुनला संधी न मिळण्यामागचं मोठं कारण म्हणजे अर्शद खान. या अर्शदने येताच राजस्थान रॉयल्स विरुद्ध 3 विकेट्स घेतल्या. मुंबईने हा सामना जिंकला. त्यामुळे रोहितसमोर चांगले गोलंदाज असल्याने कदाचित अर्जुनला पुढे या मोसमात संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.