AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir : विराट कोहली आणि गौतम गंभीर वादात युवराज सिंहची उडी, कोहलीला टॅग करत म्हणाला…

अनेक आजी माजी खेळाडूंनी या वादावर प्रतिक्रिया देताना एका कोणाला दोष न देता क्रिकेटसाठी हे चांगलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अशातच टीम इंडियाला दोन्ही वर्ल्ड कप मिळवून देण्यामध्ये मोलाचीस भूमिका बजावणारा माजी खेळाडू युवराज सिंह याने या वादामध्ये उडी घेतली आहे.

Gautam Gambhir : विराट कोहली आणि गौतम गंभीर वादात युवराज सिंहची उडी, कोहलीला टॅग करत म्हणाला...
| Updated on: May 05, 2023 | 5:55 PM
Share

मुंबई : आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयलस चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यामध्ये मोठा राडा झालेला आपण पाहिला. स्टार खेळाडू विराट कोहली आणि माजी खेळाडू गौतम गंभीर भर सामन्यामध्ये भिडले. दोन दिग्गज खेळाडू मैदानामध्ये ऑन कॅमेरा भिडल्याने क्रिकेट वर्तुळात त्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. अनेक आजी माजी खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया देताना एका कोणाला दोष न देता असा प्रकार नाही व्हायला पाहिजे. क्रिकेटसाठी हे चांगलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. अशातच टीम इंडियाला दोन्ही वर्ल्ड कप मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणारा माजी खेळाडू युवराज सिंह याने रोखठोकपणे मत मांडत या वादामध्ये उडी घेतली आहे.

युवराज सिंह दोन्ही खेळाडूंसोबत म्हणजे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्याबर क्रिकेट खेळला आहे. दोघांसोबत त्याने ड्रेसिंग रूमही शेअर केली आहे. विराट कोहलीला युवराज सिंह तसा सिनिअर खेळाडू तर गौतम गंभीर त्याचा सहकारी खेळाडू होता. युवराजने या वादावर बोलताना कोणताही दुजाभाव न करता दोघांचंही नाव घेत त्यांना एक सल्ला दिला आहे.

काय म्हणाला युवराज सिंह?

युवराज सिंहने या मुद्द्यावर एक मजेशीर ट्विट केलं आहे. यामध्ये, स्प्राइट या कोल्ड ड्रिंग ब्रँडला टॅग करत, मला वाटतं या ब्रँडला गौती आणि चीकूने आपल्या कॅम्पेनसाठी साईन करायला हवं, असं युवराज सिंहने ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच युवीने आपल्या ट्विटमध्ये दोघांना टॅग करत शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.

युवराज सिंग टीम इंडियामधील सर्वात खोडकर, मस्तीखोर आणि जॉली खेळाडू असल्याचं क्रिकेट जगताला माहित आहे. युवीने संघात असताना केलेली मस्ती इतर खेळाडूंनी मुलाखतीमध्ये सांगितली आहे. युवराज सिंगने आता या वादावर  बोलताना थेट दोन्ही खेळाडूंनी शांत राहण्याचा सल्ला दिला असला तरी विराट आणि गंभीर ऐकतात की नाही  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.