आयपीएल 2024 स्पर्धेतील ट्रेंड कायम, चेन्नईने घरच्या मैदानावर गुजरातला केलं 63 धावांनी पराभूत
आयपीएल 2024 स्पर्धेतील सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर धावांनी मात दिली. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरातला काही गाठता आलं नाही.

आयपीएल 2024 स्पर्धेत आतापर्यंत 7 सामने खेळले गेले आहेत. यात आतापर्यंत होम ग्राउंडवर खेळणाऱ्या संघाचा दबदबा दिसून आला आहे. आतापर्यंत सातही सामन्यात हे चित्र पाहायला मिळालं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील चेपॉक मैदानावर रंगला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने 63 धावांनी जिंकला. नाणेफेकीचा कौल गमवूनही या सामन्यावर चेन्नईची मजबूत पकड दिसली. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सने स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला आहे. तर गुजरात टायटन्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 206 धावा केल्या. तसेच विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. गुजरात टायटन्सचा संघ 20 षटकात 148 धावा करू शकला. यामुळे गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्सने 4 गुणांसह थेट अव्वल स्थानी झेप घेतली.
चेन्नई सुपर किंग्सचा डाव
चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी केली. रचिन रविंद्र धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे काही खास करू शकला नाही. अवघ्या धावांवर तंबूत परतला. पण रहाणे-गायकवाड जोडीने धावांची भागीदारी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाड धावांवर बाद झाला. मात्र मैदानात शिवम दुबे नावाचं वादळ घोंघावू लागलं होतं. शिवम दुबने चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तर समीर रिझवीनेही 6 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने 14 धावा केल्या.
गुजरात टायटन्सचा डाव
विजयासाठी दिलेल्या 207 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा डाव अडखळत झाला. वृद्धीमान साहा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात होती. त्यांच्याकडून आक्रमक खेळीची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. शुबमन गिल 8 धावांवर असताना पायचीत झाला. त्यानंतर वृद्धीमान साहा 21 धावा करून तंबूत परतला. तर विजय शंकर काही खास करू शकला नाही. अवघ्या 12 धावांवर बाद झाला. डेविड मिलर आणि साई सुदर्शन या जोडीकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या. मात्र डेविड मिलर 16 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. त्यामुळे साई सुदर्शनवर दडपण वाढलं. संकटात सापडलेल्या संघाला त्याला बाहेर काढता आलं नाही. साई सुदर्शन 37 धावा करून बाद झाला. त्यामुळे गुजरातचा पराभव निश्चित झाला.
