CSK vs GT, Video : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात शुबमन गिलनं केलं रोहित शर्मासारखं, निर्णय घेताना…
चेन्नईच्या चेपॉक मैदानात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत कर्णधार शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय घेताना एक शुबमन गिलने रोहित शर्मासारखी चूक केली.

आयपीएल 2024 स्पर्धेतील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याने नाणेफेकीचा कौल जिंकला. यावेळी शुबमन गिल याने नाणेफेकीचा कौल जिंकताच गोलंदाजी स्वीकारली. मात्र हा निर्णय घेताना मोठी चूक केली. क्रिकेट फॅन्सना यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याची आठवण आली. कारण रोहित शर्माचा विसरभोळा स्वभाव सर्वश्रूत आहे. अनेकदा निर्णय काय घ्यायचा हे रोहित शर्मा ऐनवेळी विसरून जातो. रोहितचा हा स्वभाव अनेकांनी प्रत्यक्षात अनुभवला आहे. विराट कोहलीनेही त्याच्या विसरभोळेपणाचे अनेक किस्से सांगितले आहेत. शुबमन गिलने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करणार असं सांगितलं. पण त्याच्या ही चूक लक्षात आली आणि तात्काळ निर्णय बदल गोलंदाजी करणार असल्याचं सांगितलं. यावेळी झालेली चूक त्याच्या लक्षात आली आणि हसू लागला
नाणेफेकीनंतर शुबमन गिल म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना फिजिकली आणि मेंटली दमवणारा होता. प्रत्येकाने बऱ्यापैकी आराम केला आहे. आम्हाला सामन्यांदरम्यान पुरेसा विश्रांतीचा वेळ मिळतो. आमच्या गोलंदाजांनी मुंबईविरुद्ध कसा बाऊंस बॅक केला. आमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही. पहिल्या सामन्यातील संघच उतरेल.” पण शुबमन गिलचं असं वागणं पाहून नेटकऱ्यांना रोहित शर्माची आठवण आली.
🚨 Toss Update 🚨
Gujarat Titans win the toss and elect to bowl against Chennai Super Kings.
Follow the Match ▶️ https://t.co/9KKISx5poZ#TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/qk8xLYhUlH
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2024
चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करत 6 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. आता हे आव्हान गुजरात टायटन्स हे आव्हान गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. शिवम दुबने 23 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 51 धावा केल्या. तर ऋतुराज गायकडवाड आणि रचिन रविंद्रने प्रत्येकी 46 धावा केल्या. डेरिल मिचेल नाबाद 24 तर रविंद्र जडेजा नाबाद 7 धावांवर राहिला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन
