CSK vs KKR : कॅप्टन ऋतुराजचं दमदार अर्धशतक, चेन्नई विजयाजवळ
Ruturaj Gaikwad Fifty : ऋतुराज गायकवाड याने आपलं आयपीएलच्या 17 व्या मोसमातील पहिलं अर्धशतक कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ठोकलं आहे. ऋतुराजने या अर्धशतकासह चेन्नईला विजयाजवळ आणून ठेवलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार पुणेकर ऋतुराज गायकवाड याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेसिंग करताना शानदार अर्धशतक ठोकत आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. ऋतुराज गायकवाड याने 138 धावांचा पाठलाग करताना 12 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर अर्धशतक पूर्ण केलं. ऋतुराजच्या या अर्धशतकानंतर चेन्नई विजयाच्या आणखी जवळ येऊन पोहचली आहे. त्यामुळे ऋतुराजनेच विनिंग शॉट मारुन नाबाद परतावं, अशी ऋतुराज चाहत्यांची अपेक्षा आहे. ऋतुराजने 45 बॉलमध्ये 111.11 च्या स्ट्राईक रेटने 7 चौकारांसह 50 धावा पूर्ण केल्या. ऋतुराजने या अर्धशतकादरम्यान 7 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. ऋतुराजच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 15 वं अर्धशतक ठरलं. तसेच ऋतुराजने या दरम्यान सहकाऱ्यांसह चेन्नईसाठी चांगली भागीदारीही केली.
ऋतुराज गायकवाड याचं अर्धशतक
Skipper leading from the front 🫡
Ruturaj Gaikwad brings 🆙 his maiden 5️⃣0️⃣ of #TATAIPL 2024 👏👏
Follow the Match ▶ https://t.co/5lVdJVscV0 #CSKvKKR | @ChennaiIPL pic.twitter.com/9TJXQHTDcR
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2024
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.
