AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : चेन्नई विरुद्धच्या विजयानंतर दिल्ली कॅप्टन ऋषभ पंतवर मोठी कारवाई

IPL 2024 Rishabh Pant : ऋषभ पंत याने आपल्या नेतृत्वात दिल्ली कॅपिट्ल्सला पहिला विजय मिळवून दिला. चेन्नईवर दिल्लीने 20 धावांनी विजय मिळवला. मात्र या विजयानंतर कॅप्टन पंतला मोठा झटका लागला आहे.

IPL 2024 : चेन्नई विरुद्धच्या विजयानंतर दिल्ली कॅप्टन ऋषभ पंतवर मोठी कारवाई
rishabh pant dc run out ipl 2024Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 01, 2024 | 3:46 PM
Share

दिल्ली कॅपिट्ल्सची आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सुरुवात सलग 2 पराभवाने झाली. मात्र ऋषभ पंत याच्या नेतृत्वात दिल्लीने अखेर तिसऱ्या सामन्यात विजयाचा नारळ फोडला. आपल्या घरच्या मैदानात दिल्लीने चेन्नई सुपर किंग्सचा विजयी रथ रोखत पहिल्या विजयाची नोंद केली. हा सामना दिल्लीसाठी अनेक अर्थाने अविस्मरणीय ठरला. दिल्लीच्या या विजयात कॅप्टन ऋषभ पंतने फलंदाज म्हणून भूमिका बजावली. पंतने 15 महिन्यांच्या कमबॅकनंतर दमदार अर्धशतक ठोकत आपण फिट असल्याचं दाखवून दिलं. पंतने इतकंच नाही तर अर्धशतकासह टी 20 वर्ल्ड कपसाठी दावा ठोकला. मात्र दिल्लीच्या विजयावर बीसीसीआयच्या कारवाईचं विरजण पडलं आहे. बीसीसीआयने कॅप्टन पंतवर मोठी कारवाई केली आहे.

ऋषभला चेन्नई विरुद्धच्या सामन्यात एक चूक चांगलीच महागात पडली. पंतच्या चुकीमुळे बीसीसीआयने त्याच्यावर 12 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. पंत कॅप्टन म्हणून सामन्यात ओव्हर रेट कायम राखण्यात अपयशी ठरला. त्यामुळे बीसीसीआयने कॅप्टन म्हणून त्याच्यावर ही कारवाई केली आहे. पंतची अशी चूक होण्याची ही पहिलीच वेळ होती. नियमांनुसार, सामन्यादरम्यान ठराविक वेळेत अपेक्षित ओव्हरचा खेळ पूर्ण करायचा असतो. त्याची सर्वस्व जबाबदारी ही कॅप्टनची असते. आता पंतला ओव्हर रेट कायम राखता आला नाही. त्यामुळे पंतला मानधनातून 12 लाख रुपये दंड द्यावा लागणार आहे. पंतच्या आधी गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल याच्यावरही स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली होती.

सामन्याचा धावता आढावा

दरम्यान दिल्लीने पहिले बॅटिंग करताना डेव्हिड वॉर्नर-कॅप्टन पंत या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर आणि पृथ्वीच्या अप्रतिम खेळीच्या मदतीने 5 विकेट्स गमावून 191 धावांपर्यंत मजल मारली. डेव्हिड वॉर्नर याने 52, पंतने 51 आणि पृथ्वीने 43 धावा केल्या. त्यानंतर 192 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला दिल्लीच्या खलील अहमद याने 21 धावांच्या मोबदल्यात 2 आणि मुकेश कुमार याने 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे चेन्नईला 6 विकेट्स गमावून 171 धावांपर्यंत पोहचता आलं.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना आणि मुस्तफिजुर रहमान.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.