AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs GT : दिल्लीचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय, गुजरातवर 4 धावांनी मात

IPL 2024 DC vs GT Highlights In Marathi : आयपीएलच्या 17 व्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सने हा गुजरात टायटन्सवर दुसरा विजय मिळवला आहे.

DC vs GT : दिल्लीचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय, गुजरातवर 4 धावांनी मात
delhi capitals ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 24, 2024 | 11:38 PM
Share

दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात शेवटच्या बॉलवर 4 धावांनी थरारक विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने अखेरपर्यंत जोरदार लढत दिली. मात्र गुजरातचे प्रयत्न 4 धावांनी कमी पडले. गुजरातला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 220 धावाच करता आल्या. दिल्लीचा या हंगामातील एकूण चौथा आणि गुजरात टायटन्स विरुद्धचा दुसरा विजय ठरला. दिल्लीने याआधी 17 एप्रिलला गुजरातवर मात केली होती.

गुजरातकडून साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. साईने 39 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलरने 23 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने 55 धावा ठोकल्या. ओपनर ऋद्धीमान साहा याने 25 बॉलमध्ये 39 धावा केल्या. अखेरीस आर साई किशोर आणि राशिद खान या दोघांनी काही मोठे फटके मारुन गुजरातला विजयजवळ आणलं मात्र त्यांना विजयी करण्यात यश आलं नाही. राशिद खानने नाबाद 21 धावा केल्या. आर साई किशोर 13 रन्सवर आऊट झाला. तर इतरांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. दिल्लीकडून रसिख दार सलाम याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर एनरिच नॉर्तजे, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल या तिघांनी 1-1 विकेट मिळाली.

दिल्लीची बॅटिंग

त्याआधी दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 224 धावा केल्या. दिल्लीकडून कॅप्टन ऋषभ पंत याने सर्वाधिक धावा केल्या. तर अक्षर पटेल याने अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी केलेली शतकी भागीदारी निर्णायक ठरली. त्याआधी दिल्लीने झटपट 3 विकेट्स गमावल्या होत्या.

जेक फ्रेझर-मॅकगर्क 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर पृथ्वी शॉ 11 धावांवर बाद झाला. शाई होप 5 रन करुन आऊट झाला. त्यामुळे दिल्लीची स्कोअर 5.4 ओव्हरमध्ये 3 विकेट 44 असा झाला. त्यांनतर 69 बॉलमध्ये ऋषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेल याने 66 धावा केल्या. तर ऋषभ पंत 43 बॉलमध्ये 88 धावांवर नाबाद राहिला. तर ट्रिस्टन स्ट्रब्सने 7 बॉलमध्ये नाबाद 26 धावांचं योगदान दिलं. गुजरातकडून संदीप वॉरियर याने 3 विकेट्स घेतल्या. तर नूर अहमद याने 1 विकेट घेतली.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अझमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा आणि संदीप वॉरियर.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.