AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs SRH : गुजरात टायटन्सने 7 विकेट्सने लोळवल्यानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला उपरती, म्हणाला..

आयपीएल 2024 स्पर्धेतील 12वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी घेतली. पण गुजरातने त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला आणि 7 विकेट्सने मात दिली. सामन्यातील पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आपली बाजू मांडली आहे.

GT vs SRH : गुजरात टायटन्सने 7 विकेट्सने लोळवल्यानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला उपरती, म्हणाला..
GT vs SRH : गुजरात टायटन्सकडून पराभवाची धूळ चाखल्यानंतर पॅट कमिन्स चुकांबाबत केलं सर्व उघड
| Updated on: Mar 31, 2024 | 7:55 PM
Share

सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी सुरुवातीच्या दोन सामन्यात आक्रमक फलंदाजीचं रुप दाखवलं. कोलकात्याविरुद्ध हातात आलेला सामना फक्त 4 धावांनी गमवावा लागला. तर मुंबई इंडियन्सविरुद्ध धावांचा डोंगर रचला. तसेच मुंबईला 31 धावांनी पराभूत केलं. मात्र तिसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने 7 गडी राखून हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हैदराबादची सुरुवात एकदम निराशाजनक राहिली. तसेच फलंदाज एक एक करून मैदानात काही धावा करून तंबूत परतत होते. एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादला 20 षटकात 8 गडी गमवून 162 धावा करता आल्या. तसेच विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. गुजरात टायटन्सने 19.1 षटकात 3 गडी गमवून हे आव्हान गाठलं. त्यामुळे गुणतालिकेत हैदराबादला फटका बसला आहे. सामन्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स याने नेमकं काय चुकलं ते सांगितलं.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, “कदाचित आम्हाला आणखी 10-15 धावांची गरज होती. मला वाटते की त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही झटपट विकेट्स गमावल्या. तसेच आमच्याकडून एकानेही 50 धावा करू शकला नाही. आम्हाला वाटले की विकेट थोडी हळू जाईल. आमच्याकडे गोलंदाजीचे 8 पर्याय होते. दोन्ही डावात विकेट सारखीच असेल असं वाटलं. पण हे टी20 क्रिकेट आहे ना? त्यांनी चांगली फलंदाजी केली.”

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, “घरच्या मैदानावर दोन सामने जिंकलो ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. आमचा पुढचा सामना देखील येथे आहे आणि नंतर आम्हाला आणखी काही सामने मिळाले आहेत. आम्ही परत येईपर्यंत आम्हाला या स्पर्धेत चांगली गती मिळालेली असेल, अशी आशा आहे. आमच्या गोलंदाजांनी मधल्या ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. खरंच अप्रतिम होतं.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.

Follow Us
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच...
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच....
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे.
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ.
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत...
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत....
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार.
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही....
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही.....
कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला...
कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला....
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...