AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, LSG vs MI: मुंबई इंडियन्ससाठी करो या मरोची लढाई! दोन्ही संघांच्या या खेळाडूंकडे असेल नजर

आयपीएल 2024 स्पर्धेतील 48वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. गुणतालिकेत लखनौचा संघ 10 गुणांसह पाचव्या, तर मुंबईचा संघ 6 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय दोन्ही संघांना महत्त्वाचा आहे.

IPL 2024, LSG vs MI: मुंबई इंडियन्ससाठी करो या मरोची लढाई! दोन्ही संघांच्या या खेळाडूंकडे असेल नजर
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 29, 2024 | 4:06 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढत मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच भिडणार आहेत. मुंबई इंडियन्सचे एकूण पाच सामने शिल्लक आहेत. त्यापैकी दोन सामने लखनौ आणि दोन सामने कोलकाता नाईट रायडर्ससोबत आहेत. मुंबई इंडियन्सची प्लेऑफची शर्यत किचकट झाली आहे. मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरीत पाचही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. म्हणजेच 10 गुणांसह आता असलेल्या 6 गुणांची बेरीज करता 16 गुण होतील. 16 गुण असलेला संघ प्लेऑफसाठी क्वॉलिफाय करतो. त्यामुळे यापुढे प्रत्येक सामना मुंबई इंडियन्ससाठी करो या मरोची लढाई आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना लखनौच्या एकाना स्पोर्ट्स सिटी स्टेडियममध्ये होणार आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सचे स्पर्धेत एकूण 5 सामने शिल्लक असून त्यापैकी काहीही करून तीन सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आतापर्यंत 4 सामने झाले आहेत. त्यापैकी लखनौने 3 आणि मुंबई इंडियन्सने एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात जबरदस्त रंगत पाहायला मिळणार आहे. या सामन्यात लखनौचे चार आणि मुंबई इंडियन्सचे सात खेळाडू कमाल करू शकतात. लखनौ सुपर जायंट्सकडून केएल राहुल, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस आणि रवि बिष्णोई यांचा समावेश असेल. तर मुंबई इंडियन्सकडून इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांचा समावेश असेल.

लखनौच्या एकाना मैदानातील खेळपट्टीत मागच्या वर्षीच्या तुलनेत बदल करण्यात आला आहे. मागच्या वर्षी ही खेळपट्टी संथ आणि फलंदाजीसाठी कठीण होतं. मात्र आता मधल्या षटकांमध्ये फलंदाजांना चान्स घेत येईल. सीमारेषा तुलनेनं लांब असल्याने गोलंदाज फायदा घेऊ शकतात. वेगवान गोलंदाजांना बाउंसर आणि स्लो चेंडू टाकून फलंदाजांना जाळ्यात फसवता येईल. फिरकीपटू या मैदानात आपली जादू दाखवू शकतात.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, दीपक हुड्डा,मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, रवि बिष्णोई, मॅट हेन्री, मोहसिन खान, यश ठाकुर.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, ल्यूक वूड.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....