IPL 2024, MI vs RR : रोहित शर्मा पुन्हा अडकला ट्रेंट बोल्टच्या जाळ्यात, पुन्हा तसंच काहीसं झालं

आयपीएल 2024 स्पर्धेतील 38वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबई इंडियन्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण मुंबई इंडियन्सला सुरुवातीलाच धक्के बसले. रोहित शर्मा आणि इशान किशन स्वस्तात बाद झाले.

IPL 2024, MI vs RR : रोहित शर्मा पुन्हा अडकला ट्रेंट बोल्टच्या जाळ्यात, पुन्हा तसंच काहीसं झालं
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 8:07 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाने मुंबई इंडियन्सची पुन्हा एकदा कोंडी केली आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय क्रीडाप्रेमींना रुचला नाही. कारण दव फॅक्टर खूपच महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितलं की, मागच्या दोन तीन दिवस आम्ही या मैदानात आहोत. पण दव कुठे काही दिसलं नाही. त्यामुळे प्रथम फलंदाजी घेत आहोत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने निर्णय मनासारखा झाला असल्याचं सांगितलं. त्याची प्रचिती पहिल्या षटकात आली देखील. राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने रोहित शर्माला दुसऱ्यांदा तंबूचा रस्ता दाखवला. यापूर्वी वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माची विकेट काढली होती. तेव्हा रोहित शर्माला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. विशेष म्हणजे स्टम्पच्या मागे संजू सॅमसनने त्याचा झेल पकडला होता. आताही तसंच काहीसं झालं आहे.

रोहित शर्माने ट्रेंट बोल्टच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर तिसरा आणि चौथा चेंडू निर्धाव गेला. त्यामुळे पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने उत्तुंग षटकार मारण्यासाठी बॅट उचलली. मात्र चेंडू बॅटला बरोबर कनेक्ट झाला नाही आणि वर चढला. विकेटकीपर संजू सॅमसनने जराही चूक न करता झेल पकडला. त्यामुळे रोहित शर्माचा डाव 6 धावांवर आटोपला. क्रीडाप्रेमींना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तसं काही झालं नाही. रोहित शर्मा तंबूत परतत नाही तोच इशान किशनही बाद झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. आता मधल्या फळीतील फलंदाजांवर मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान आहे.

ट्रेंट बोल्ट आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या षटकात आतापर्यंत 26 गडी बाद केले आहेत. त्या खालोखाल सनरायझर्स हैदराबादचा भुवनेश्वर कुमार असून 25 विकेट्स, प्रवीण 15, संदीप शर्मा 13 आणि झहीर खानने 12 गडी बाद केले आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

Non Stop LIVE Update
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.