IPL 2024, PBKS vs SRH : पंजाब किंग्सला बसला 21 धावांचा फटका, एक चूक संघाला भोवली
आयपीएल 2024 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. शिखर धवनने खेळपट्टीचा अंदाज घेऊन तात्काळ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमवून 182 धावा केल्या. पण यातील 21 धावा एका चुकीमुळे आल्या.

आयपीएल 2024 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात पंजाब किंग्सकडून पहिल्याच चेंडूवर मोठी चूक झाली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार शिखर धवनने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच संघाचं पहिलं षटक अनुभवी कागिसो रबाडाकडे सोपवलं. पहिल्याच चेंडू टाकताना समोर हेड होता. हेडसाठी पंजाबने जाळं रचलं होतं. रबाडाने पहिलाच चेंडू टाकला आणि पुसटशी अपील झाली. पंचांनी नाबाद असल्याचं सांगितलं. मात्र स्वत:च्या निर्णयाबाबत निश्चित नव्हता. कारण हेडच्या बॅटला चेंडू घासून थेट विकेटकीपरच्या हाती गेला होता. विकेटकीपर जितेश शर्मा अपील करत राहिला.पण रबाडाने त्यावर हवी तशी प्रतिक्रिया दिली नाही. कर्णधार शिखर धवननेही रिव्ह्यू घेतला नाही. पण जेव्हा रिप्ले पाहिला गेला तेव्हा हेड आऊट असल्याचं दिसून आहे. पंजाबच्या या चुकीचा संघाला फटका बसला.
ट्रेव्हिस हेड रबाडाच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला असता. पण डीआरएसचा निर्णय न घेतल्याने 21 धावांचा फटका बसला. ट्रेव्हिस हेडने चार चौकार ठोकले. 15 चेंडूंचा सामना करत 21 धावा केल्या. पंजाब किंग्सला चौथ्या षटकात आपली चूक सुधारता आली. अर्शदीपने ट्रेव्हिस हेडला बाद केलं. हेडने अर्शदीपला षटकार मारण्याचा प्रयत्न केला. शिखर धवनने त्याचा जबरदस्त झेल पकडला. त्यानंतर एडन मार्करमला शून्यावर तंबूत पाठवून काही अंशी संघाला दिलासा दिला.
View this post on Instagram
सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. यातून 21 धावा वजा केल्या तर हे आव्हान 162 वर आलं असतं. पण क्रिकेट हा जर तरचा खेळ आहे. त्यामुळे कधी काय होईल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. सध्यातरी पंजाब किंग्सला 21 धावांचा फटका बसलं असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
