AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs SRH : 0,3,9,0, हैदराबादची पावर प्लेमध्ये दुर्दशा, केकेआरकडून 4 झटके, मिचेल स्टार्कचा झटका

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Qualifier 1 : निर्णायक सामन्यात सनरायजर्स हैदराबादला बॅटिंगची संधी मिळाल्याने त्यांची विस्फोटक सलामी जोडी धमाकेदार खेळी करतील, अशी चाहत्यांना आशा होती.मात्र कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांसमोर हैदराबादची टॉप ऑर्डर बॅटिंग ढेपाळली.

KKR vs SRH : 0,3,9,0, हैदराबादची पावर प्लेमध्ये दुर्दशा, केकेआरकडून 4 झटके, मिचेल स्टार्कचा झटका
mitchell starc kkr vs srh ipl 2024Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 21, 2024 | 8:39 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने जोरदार सुरुवात केली आहे. केकेआरने टॉस जिंकला. कॅप्टन श्रेयस अय्यर याने फिल्डिंगचा निर्णय घेत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कोलकाताच्या गोलंदाजांनी कॅप्टन श्रेयसचा निर्णय योग्य ठरवला. हैदराबादच्या टीममध्ये ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा या आणि इतर विस्फोटक फलंदाजांनी केकेआरच्या गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या. हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने या हंगामातील साखळी फेरीत अनेक रेकॉर्ड केले. मात्र प्लेऑफ 1 च्या निर्णायक सामन्यात फ्लॉप ठरले. मिचेल स्टार्कच्या धारदार गोलंदाजीसमोर केकेआरने पहिल्या 5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावल्या. हैदराबादने त्या 4 पैकी 2 विकेट्सने सलग गमावल्या.

मिचेल स्टार्कचा दणका

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा असलेला मिचेल स्टार्क या एकट्याने 4 पैकी 3 विकेट्स घेतल्या. स्टार्कने हैदराबादच्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये विस्फोटक ट्रेव्हिस हेड याला झिरोवर क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये वैभव अरोरा याने अभिषेक शर्मा याचा काटा काढला. अरोराने शर्माला आंद्रे रसेल याच्या हाती 3 धावांवर कॅच आऊट केलं. त्यामुळे हैदराबादची 1.5 ओव्हरमध्ये 2 बाद 13 अशी धावसंख्या झाली.

त्यानंतर मिचेल स्टार्क आपल्या कोट्यातील दुसरी आणि हैदराबादच्या डावातील पाचवी ओव्हर टाकायला आला. स्टार्कने या ओव्हरमध्ये धमाका केला. स्टार्कने या ओव्हरमधील पाचव्या आणि सहाव्या बॉलवर सलग 2 विकेट्स घेतल्या. स्टार्कने पाचव्या बॉलवर नितीश रेड्डी याला 9 धावांवर गुरुबाज याच्या हाती कॅच आऊट केलं. तर पुढील बॉलवर शाहबाज अहमद याला क्लिन बोल्ड केलं. त्यामुळे हैदरबादची 5 ओव्हरनंतर 4 बाद 39 अशी स्थिती झाली आहे.

ट्रेव्हिस हेडची दांडी गुल

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.

कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट प्लेअर्स : अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर्स: सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि जयदेव उनाडकट.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.