AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 RCB vs LSG Live Streaming : आरसीबी-लखनऊ दुसऱ्या विजयाच्या प्रतिक्षेत, सामना केव्हा?

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Streaming : लखनऊच्या तुलनेत आरसीबीने एक सामना जास्त खेळला आहे. मात्र त्यानंतरही आरसीबीची परिस्थिती ही लखनऊसारखीच आहे.

IPL 2024 RCB vs LSG Live Streaming : आरसीबी-लखनऊ दुसऱ्या विजयाच्या प्रतिक्षेत, सामना केव्हा?
KL RAHUL AND FAF DU PLESSIS IPL,
| Updated on: Apr 01, 2024 | 4:36 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने असणार आहेत. केएल राहुल लखनऊचं नेतृत्व करणार आहे. तर फाफ डु प्लेसीस आरसीबीची धुरा सांभाळणार आहे. लखनऊचा हा या मोसमातील तिसरा आणि आरसीबीचा चौथा सामना असणार आहे. लखनऊ आणि बंगळुरु या दोन्ही संघांना आतापर्यंत एकच सामना जिंकण्यात यश आलं आहे. लखनऊ आणि आरसीबी दोन्ही संघ पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या आणि नवव्या स्थानी आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा या सामन्यात विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.

आरसीबी विरुद्ध एलएसजी सामना केव्हा?

आरसीबी विरुद्ध एलएसजी सामना 2 एप्रिल रोजी होणार आहे.

आरसीबी विरुद्ध एलएसजी सामना कुठे?

आरसीबी विरुद्ध एलएसजी सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे होणार आहे.

आरसीबी विरुद्ध एलएसजी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आरसीबी विरुद्ध एलएसजी सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.

आरसीबी विरुद्ध एलएसजी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

आरसीबी विरुद्ध एलएसजी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर महत्त्वाचे अपडेट जाणून घेता येतील.

आरसीबी विरुद्ध एलएसजी सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

आरसीबी विरुद्ध एलएसजी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहता येईल.

आरसीबी टीम : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन) यश दयाल, विजयकुमार विशक, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरन, कॅमरन, मोहम्मद सिराज, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत.

लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकुर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेरक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक हुड्डा, कृष्णा गौथम, एश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, मोहसिन खान, मोहसीन खान, अमित मिश्रा आणि अर्शद खान.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.