Riyan Parag : रियान परागचा आयपीएलमध्ये महारेकॉर्ड, एकाच हंगामात 5 वर्षांची भरपाई

Riyan Parag RR vs PBKS : रियान परागने पंजाब किंग्स विरुद्ध 48 धावांची खेळी केली. रियानने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Riyan Parag : रियान परागचा आयपीएलमध्ये महारेकॉर्ड, एकाच हंगामात 5 वर्षांची भरपाई
riyan parag rajasthan royalsImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 11:03 PM

राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान पराग याने आपल्या घरच्या मैदानात पंजाब किंग्स विरुद्ध आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात इतिहास रचला आहे. रियानने गुवाहाटाीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये टीम अडचणीत असताना 34 बॉलमध्ये 48 धावांची महत्त्वपू्र्ण खेळी केली. रियानने केलेल्या या खेळीमुळे राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 144 धावांपर्यंत पोहचता आलं. रियानने राजस्थानला अडचणीतून काढलं. मात्र तो दुर्देवी ठरला. रियानचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. रियानला हर्षल पटेल याने आऊट केलं. रियानने या 48 धावांच्या खेळीत 6 चौकार ठोकले.

रियानने या 48 धावांच्या खेळीसह मोठा विक्रम केला. रियानने आयपीएलच्या 17 व्या मोसमात 500 धावांचा टप्पा पर केला. रियान यासह या हंगामात 500 धावा पूर्ण करणारा पहिला अनकॅप्ड फलंदाज ठरला. रियान यासह आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पाचवा फलंदाज ठरला.

4 अनकॅप्ड फलंदाज

रियानच्या आधी अशी कामगिरी ही पंजाब किंग्सकडून शॉन मार्श याने 2008 साली केली होती. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने 2018 साली 500 धावा ठोकल्या होत्या. इशान किशन याने 2020 साली 500 धावा पूर्ण केल्या होत्या. तर यशस्वी जयस्वाल याने 2023 मध्ये असा कारनामा केला होता.

दरम्यान रियानने या खेळीसह गेल्या 5 वर्षांची भरपाई एकाच वर्षात पूर्ण केली. रियानसाठी गेली 5 वर्ष ही खास राहिली नाही. मात्र त्याला हंगामात सूर गवसला आणि त्याने धमाका करुन दाखवला. रियानने 2019 मध्ये आयपीएल पदार्पण केलं. तेव्हापासून ते 2023 पर्यंत रियानला एकाही हंगामात 200 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.

रियानने 2019 मध्ये 7 सामन्यात 160 धावा केल्या. त्यानंतर पुढील 2 वर्ष रियानसाठी निराशाजनक राहिली. त्यानंतर रियानने 2022 मध्ये 17 सामन्यांत 183 धावा केल्या. रियानला 2023 मध्ये संपूर्ण सामने खेळवण्यात आलं नाही. रियानने गत 5 हंगाांममध्ये एकूण 54 सामन्यांमध्ये 16.22 च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह 600 धावा केल्या.

रियान पराग 500 पार

पंजाब किंग्ज प्लेईंग इलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान आणि युझवेंद्र चहल.

Non Stop LIVE Update
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब.
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले.
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?.
सुप्रिया सुळेंमुळे लोक पक्ष सोडताय, तरुण महिला नेत्याचे गंभीर आरोप
सुप्रिया सुळेंमुळे लोक पक्ष सोडताय, तरुण महिला नेत्याचे गंभीर आरोप.
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण...
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण....
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?.
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात..
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात...
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?.
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट.
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल.