CSK vs RR : वैभव सूर्यवंशीने मनं जिंकली, सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या पाया पडला, पाहा व्हीडिओ
Vaibhav Suryavanshi Touch MS Dhoni Feet Viral Video : राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याने 20 मे रोजी चेन्नई विरूद्धच्या सामन्यानंतर भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. वैभव चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या पाया पडला. पाहा व्हायरल व्हीडिओ.

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 18 व्या हंगामात राजस्थान रॉयल्स टीमचा प्रवास संपला आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या या हंगामातील शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर शानदार विजय मिळवला. राजस्थानचा 14 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने धमाकेदार खेळी केली. वैभवने विजयी धावांचा पाठलाग करताना 57 धावा केल्या. वैभवने या मोसमातून पदार्पण करत छाप सोडली आणि क्रिकेट विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. वैभवने राजस्थानच्या या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात जाता जाता पुन्हा क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. वैभवने सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार आणि दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी याच्या पाया पडला. वैभवच्या या कृतीने साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं मनं जिंकली. वैभवने धोनीच्या पायाला स्पर्श करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सामन्यानंतर परंपरेनुसार दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करतात. त्यानुसार चेन्नई आणि राजस्थानचे खेळाडू एकमेकांसह हस्तांदोलन करत होते. अशात धोनी आणि वैभव सूर्यवंशी हे आयपीएल इतिहासातील सर्वात वयस्कर आणि युवा खेळाडू एकमेकांसमोर आले. तेव्हा वैभवने हात न मिळवता थेट धोनीच्या पायाला स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतला. त्यानंतर धोनीने वैभवच्या पाठीवर हात फिरवला आणि संवाद साधला. दोघांमध्ये नक्की काय संवाद झाला हे समजू शकलं नाही. मात्र वैभवने धोनीच्या पाया पडून त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर केलेले संस्कार दाखवून दिले.
वैभव सूर्यवंशीची प्रतिक्रिया
वैभवच्या कृतीनंतर त्याच्यासोबत माजी भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंह सिधू आणि हरभजन सिंह या दोघांनी संवाद साधला. तेव्हा दोघांनी वैभवचं या कृतीबाबत कौतुक केलं. तसेच वैभवने या दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. वैभवने या दरम्यान धोनीच्या पाया पडण्याबाबतही प्रतिक्रिया दिली. “अनेकांचं त्यांना (धोनी) भेटायचं स्वप्न असतं. मी त्यांच्या विरुद्ध खेळत होतो. ते सिनिअर आहेत. तर त्यांना आदर देणं हे माझं काम आहे”, असं वैभवने म्हटलं.
वैभव सूर्यवंशीची मनं जिंकणारी कृती
Jurel says that’s how it’s done 😎@rajasthanroyals sign off from #TATAIPL 2025 in an emphatic way 🩷
Updates ▶ https://t.co/hKuQlLxjIZ #CSKvRR pic.twitter.com/F5H5AbcIVu
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2025
सामन्याचा धावता आढावा
दरम्यान चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 17.1 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. वैभवने 57 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर कर्णधार संजू सॅमसन याने 41 धावांचं योगदान दिलं. तसेच यशस्वी जयस्वाल याने 36 रन्स केल्या. तर ध्रुव जुरेल याने नाबाद 31 धावा करत राजस्थानला विजयापर्यंत पोहचवलं.