AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs KKR : दिल्ली कॅपिट्ल्समोर 205 धावांचं आव्हान, कोलकाता विजयी ट्रॅकवर परतणार?

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders 1st Innings Highlights In Marathi : कोलकाता नाईट रायडर्सने सांघिक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्ससमोर 205 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे दिल्ली हे आव्हान पूर्ण करणार की केकेआर जिंकून विजयी ट्रॅकवर परतणार? याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे.

DC vs KKR : दिल्ली कॅपिट्ल्समोर 205 धावांचं आव्हान, कोलकाता विजयी ट्रॅकवर परतणार?
Rinku Singh and Angkrish Raghuvanshi DC vs KKR IPL 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 29, 2025 | 9:47 PM
Share

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 मधील 48 व्या सामन्यात होम टीम दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं आहे. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. केकेआरसाठी 6 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांसमोर केकेआरच्या एकालाही अर्धशतकी खेळी करता आली नाही. मात्र त्यानंतरही केकेआरने 200 पार मजल मारण्यात यश मिळवलं. केकेआरसाठी प्लेऑफच्या दृष्टीने हा या ‘करो या मरो’ असा सामना आहे. त्यामुळे केकेआर हा सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवणार की दिल्ली कॅपिट्ल्स प्लेऑफच्या आणखी जवळ येऊन पोहचणार? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

कोलकाताची बॅटिंग

दिल्लीने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीकडून सुनील नारायण आणि रहमानुल्लाह गुरुबाज या सलामी जोडीने आश्वासक आणि आक्रमक सुरुवात करुन दिली.या दोघांनी 2.5 ओव्हरमध्ये 48 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र तिसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर रहमानुल्लाह 26 रन्स करुन आऊट झाला. त्यांनतर केकेआरला 85 धावांवर दुसरा झटका लागला. ओपनर सुनील नारायण 27 रन्स करुन माघारी परतला. सुनीलने 16 चेंडूत 27 धावा केल्या.

केकेआरची सलामी जोडी माघारी परतली. त्यानंतर केकेआरने ठराविक अंतराने 2 विकेट्स गमावल्या.कर्णधार अजिंक्य रहाणे 14 चेंडूत 26 धावा करुन माघारी परतला. तर वेंकटेश अय्यर याने निराशा केली. वेंकटेशने 7 धावा केल्या. त्यानंतर रिंकु सिंह आणि अंगकृष रघुवंशी या युवा जोडीने धावा करत विकेटला ब्रेक लावला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 61 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. त्यानतंर अंगकृष आऊट झाला. अंगकृषने 32 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 44 धावा केल्या.

कोण मिळवणार 2 पॉइंट्स?

त्यानंतर रिंकु सिंह याने 25 बॉलमध्ये 36 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. रोवमॅन पॉवेलने 5 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणापर्यंत बॅटिंग करत आंद्रे रसेलन याने 9 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह निर्णायक 17 रन्स केल्या. रसेलच्या या खेळीमुळे केकेआरला 200 पार मजल मारता आली. दिल्लीकडून मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर विपराज निगम आणि कर्णधार अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. चमीरा दुष्मंथा याच्या खात्यात 1 विकेट गेली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.