DC vs KKR : कोलकाता ‘करो या मरो’ सामन्यात 14 धावांनी विजयी, दिल्लीला सलग दुसऱ्या पराभवामुळे टेन्शन
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Result : दिल्ली कॅपिट्ल्स टीमला आपल्या घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सकडून 14 धावांनी पराभूत व्हावं लागलं आहे. दिल्लीचा हा या मोसमातील चौथा पराभव ठरला,

कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर परतली आहे. केकेआरने दिल्ली कॅपिट्ल्सवर त्यांच्याच घरच्या मदैानात अर्थात अरुण जेटली स्टेडियममध्ये 14 धावांनी विजय मिळवला आहे. कोलकाताने दिल्लीला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 धावांपर्यंतच पोहचता आलं. केकेआरने अशाप्रकारे आयपीएल 2025 मधील एकूण चौथा विजय मिळवला.केकेआरसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अटीतटीचा होता. केकेआरने विजयी होत आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीचा हा या मोसमातील एकूण चौथा तर सलग दुसरा पराभव ठरला.
दिल्लीसाठी अखेरच्या क्षणी विपराज निगम याने फटकेबाजी करत सामना शेवटपर्यंत नेला.त्यामुळे दिल्ली चाहत्यांना विजयाची आशा होती. मात्र विपराजला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. विपराजने 19 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने 38 धावा केल्या. मात्र विपराजचे प्रयत्न अपुरे पडले.
दिल्लीची बॅटिंग
ओपनर अभिषेक पोरेल याने 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. करुण नायर 15 धावा करुन माघारी परतला. तर केएल राहुल 7 धावांवर रन आऊट झाला. कर्णधार अक्षर पटेल याने काही वेळ मैदानात घालवला. मात्र अक्षर निर्णायक क्षणी आऊट झाला. अक्षरने 23 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह 43 रन्स केल्या. ट्रिस्टन स्टब्स याने निराशा केली. स्टब्स 1 धाव करुन माघारी परतला. त्यामुळे दिल्ली अडचणीत सापडली. मात्र दुसऱ्या बाजूला फाफ डु प्लेसीस असल्याने दिल्लीला आशा होती. मात्र फाफ देखील अर्धशतकानंतर मोक्याच्या क्षणी आऊट झाला. फाफने 45 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरसह 62 रन्स केल्या.
फाफनंतर आशुतोष शर्मा 7 धावांवर बाद झाला. या दरम्यान विपराजची फटकेबाजी सुरु होती. मात्र दिल्ली विकेट्सही गमावत होती. आशुतोषनंतर मिचेल स्टार्क पहिल्याच बॉलवर आऊट झाला. मात्र त्यानंतरही विपराजने प्रयत्न सोडले नाहीत. विपराजने शेवटच्या ओव्हरपर्यंत दिल्लीला विजयी करण्याचा प्रयत्न केला. मात्र विपराजला दुसऱ्या बाजूने साथच मिळाली नाही. विपराज 20 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर आऊट झाला. विपराज आऊट होताच दिल्लीचा पराभव निश्चित झाला. केकेआरने अशाप्रकारे हा विजय मिळवला.
जितबो रे
Superb with the bat 😎 Skillful with the ball 🫡
Sunil Narine bags the Player of the Match award for his superb all-round performance 🏆
Scorecard ▶ https://t.co/saNudbWaXT #TATAIPL | #DCvKKR | @KKRiders pic.twitter.com/zUuD7OEIC3
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
केकेआरसाठी एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी हर्षित राणा याचा अपवाद वगळता सर्व यशस्वी ठरले. सुनील नारायण याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्थी याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच अनुकूल रॉय, वैभव अरोरा आणि आंद्रे रसेल या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
